Home महाराष्ट्र कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF)लाभार्थी जोडणी पंधरवडा कार्यशाळा नागभीड येथे संपन्न

कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF)लाभार्थी जोडणी पंधरवडा कार्यशाळा नागभीड येथे संपन्न

85

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.31ऑगस्ट):- पंचायत समिती सभागृह, नागभीड ता.नागभीड जि.चंद्रपूर ला कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत “लाभार्थी जोडनी अभियान” अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळाचे उदघाटन जि.प. चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी तालुका कृषि अधिकारी नागभीड कु. प्रिया शिंदे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणुन स्मार्ट प्रकल्पाचे आर्थिक सल्लागार पंकज इंगोले , कृषी पर्यवेक्षक अमोल शिरसाट , बॅंक ॲाफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक दुधे यांची उपस्थिती होती.

या कार्यशाळेला तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) जितेंद्र कावळे , तसेच तालुका कृषि अधिकारी नागभीड कार्यालय येथील घुगे, कु. रामटेके कृषी सहाय्यक , तालुक्यातील विविध नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, शेतकरी, शेतकरी गटाचे सदस्य, महिला बचत गट सदस्या, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

वित्तीय व आर्थिक सल्लागार पंकज इंगोले यांनी AIF योजनेचे सादरीकरण करुन प्रकल्प तयार करुन ॲानलाईन नोंदणी कशी करावी याबाबत माहीती दिली. उपस्थितांना या योजनेचा लाभ घेण्याचे आहवान केले व इतर योजनेची माहिती व लाभ घेवुन उत्पन्नात वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले.

संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केंद्रशासनाने पहिल्यांदाच शेतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद केली असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जागरुक होऊन कृषी विभागाच्या सहकार्याने कृषि आधारित उद्योग , नोंदणीकृत कृषी कंपनीच्या माध्यमातुन उभारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले . नागभीड तालुका हा तांदुळ क्लस्टर असुन यावर आधारीत विविध प्रकल्प उभारल्यास अनेक शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे नेता येऊ शकल्याचे प्रतिपादन गजपुरे यांनी केले . तसेच जंगल लगत भागातील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने जंगली जनावरांच्या त्रासामुळे न कंटाळता यासाठी प्रतिबंधित उपाययोजना करणे याबाबत मार्गदर्शन केले.

कु. प्रिया शिंदे यांनी सुद्धा उपस्थितांना स्मार्ट प्रकल्प अंतर्गत उद्योग उभारून उत्पन्नात वाढ करावे व PMFME योजना संबधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच AIF लोन एप्लीकेशन करण्याबाबत माहिती देण्यात आली . शाखा व्यवस्थापक दुधे यांनी उद्योग निवड करताना काय बाबी समोर ठेऊन निवड करावे तसेच कर्ज प्रकरणी येणाऱ्या विविध अडचणी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले . सदर कार्यशाळेचे सविस्तर नियोजन , सूत्रसंचालन व आभार जितेंद्र कावळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here