रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.31ऑगस्ट):- पोलीस पाटील भरतीकरिता ९ जुलै रोजी लेखी परिक्षा उमेदवारांकडून घेण्यात आली आणि
लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी १२-१३ जुलै, २०२३ ला घेण्यात आली पडताळणी
झाल्यानंतर पात्र उमेदवाराना तोंडी(मुलाखत) परिक्षेकरिता २० जुलै ला बोलवण्यात आले.अंतिम गाव निहाय निकाल प्रसिध्द निकाल २४ जुलै ला जाहीर करण्यात आला. आणि तालुक्यातील विविध गावी दि. ३० ऑगस्टला पोलीस पाटील यांना नियुक्त पत्र देण्यात आले. ही निवड स्पर्धा परीक्षेमधून झाली आहे.
पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा ही राज्यसेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या दर्जेची घेण्यात आली असल्याने सर्व परीक्षार्थींचे धाबे दणाणले होते. परीक्षार्थी परीक्षा देवून आले असताना प्रत्येकाच्या मुखातून पेपर चा दर्जा उंच असल्याचे चर्चा रंगतानी दिसत होते. यातही काही अभ्यासू विध्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यास बाजी मारली. नुकत्याच झालेल्या परीक्षेमधून तालुक्यातील पोलीस पाटील पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
*चार मित्र झाले चार गावचे पोलीस पाटील*
दि. ३० ऑगस्ट बुधवार ला तालुक्यातील नव-पोलीस पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. परंतु एक विशेष म्हणजे योगायोगाने चार वेगवेगळ्या गावचे पोलीस पाटील पदासाठी निवड झालेले निघाले एकमेकांचे मित्र.चार मित्र झाले चार गावचे पोलीस पाटील क्रीष्णा दिघोरे भालेश्वर, संदीप मुळे मुडझा, सचिन नाकतोडे रानबोथली, अनिरुध्द भर्रे धामणगाव यांचे परिवाराकडून व मित्रमंडळींकडून अभिनंदनास्पद कौतुक होत आहे.




