Home महाराष्ट्र दहिवडीच्या उपनगराध्यक्षांनी दिला नगराध्यक्षांना घरचा आहेर!

दहिवडीच्या उपनगराध्यक्षांनी दिला नगराध्यक्षांना घरचा आहेर!

122

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸प्रकरणाची चौकशी न झाल्यास करणार उपोषण

म्हसवड(दि.30ऑगस्ट):-दहिवडी ता.माण येथील नगरपंचायतीचे राष्ट्रवादी पुरस्कृत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर पोळ व मुख्याधिकारी कपिल जगताप आर्थिक फायद्यासाठी भोंगळ कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. यामुळे दहिवडी नगरपंचायतीतील धुसपुस चव्हाट्यावर आली आहे.माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी शहराच्या नगरपंचायतीमध्ये नक्की चाललय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

दहिवडी नगरपंचायतने पंधरावा वित्त आयोग अनुदान अंतर्गत मोरे मळा येथील पाणीपुरवठा विहीर ते पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन करण्याचे काम प्रस्तावित केले होते.त्या संदर्भात २१/०६/२०२३ रोजी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर सदर कामाबाबत शंका असून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे लक्षात येताच श्री साळुंखे यांनी दि.२४/०७/२०२३ रोजी मुख्याधिकारी दहिवडी यांना पाईपलाईन बिला संदर्भात पत्र दिले होते.त्यानंतर दि.१४/०८/२०२३ रोजी मुख्याधिकारी दहिवडी यांना दि.२४/०७/२०२३ च्या संदर्भात स्मरणपत्र दिले.

यात असे म्हटले की दि.२४/०७/२०२३ रोजी पाईपलाईनचे बिल न काढण्याबाबत पत्रव्यवहार केला होता तसेच दि.३१/०७/२०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाले नसल्याचा उल्लेख करून माझ्या परस्पर बिल अदा केल्यास माझ्यासह सहकारी नगरसेवक उपोषण करणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

यावर बोलताना श्री साळुंखे म्हणाले की दहिवडी मोरे मळा विहीर ते पाणीपुरवठा टाकीपर्यंतच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे असून गटाराच्या पाण्यातून व दहिवडी कॉलेजच्या मुतारी जवळून पाईपलाईन आल्याने पाईपलाईन फुटल्यास दहिवडीला गटाराचे पाणी व अशुद्ध पाणीपुरवठा होऊन मानवी आरोग्य धोका निर्माण होऊ शकतो तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी प्रसारमाध्यमांनी विचारले असता ४९ लाख रुपयांचे असणाऱ्या पाईपलाईनच्या कामाचे चार फूट खोलीकरण करणे बंधनकारक असताना प्रत्यक्ष दोन फुटापर्यंत केले आहे.

माझी हरकत असतानाही सदर बिल अदा केल्याने व कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याने मी नगरसेवक सहकाऱ्यांसह उपोषणास बसणार आहे.दरम्यान मी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या पत्राचे उत्तर दिनांक ११/०८/२०२३ रोजी दहिवडी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त होऊन व त्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या स्तरावरून कार्यवाही करावी व केलेली कार्यवाही संबंधितांना परस्पर कळवावी अशा सूचना करूनही दिनांक २९/०८/२०२३ पर्यंत सदर पत्रावर कोणतीही दखल न घेता मला परस्पर कळवले नाही त्यामुळे मला विश्वासात न घेता केलेल्या कामाची चौकशी करावी,अन्यथा सहकारी नगरसेवकांसह उपोषणास बसणार आहे असा घरचा आहेर त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here