सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.30ऑगस्ट):-पैसे देणे घेणेचे कारणावरून पानवणं, ता. माण येथे एका दलित महिलेला भर चौकात ऊस आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहान केली या मारहाणीचा निषेध करणारे प्रसिद्धी पत्रक माण तालुका पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब रणपिसे यांनी प्रसिद्ध केले यात त्या नाराधमाचा तीव्र निषेध करत असल्याचे जाहीर करतो.
या पत्रकात निषेध नोंदवताना एखाद्या महिलेला भरचौकात आणून काठीने ,लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली जाते वर जातीचा उद्धार करून अत्यंत अश्लील भाषा वापरली जाते ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी व नीच जातीयवादी मनोवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे .ही वृत्ती बळावतेच कशी?कायद्याचा धाक आहे की नाही?छत्रपती शिवाजी महाराज ,फुले शाहू,आंबेडकर यांचाच हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का?असा प्रश्न उपस्थित होतो.
माण तालुक्याच्या इतिहासात अशी घटना प्रथम घडत आहे .गुन्हेगारांना व आरोपींना शासन देणेसाठी या देशात कायदा व न्यायव्यवस्था जिवंत आहे त्यासाठी कोणी कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही .सामाजिक सलोखा राहावा यासाठी आम्ही सर्व पक्ष संघटनांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत तरीसुद्धा अशा जातीयवादी प्रवृत्ती डोके वर काढत आहेत यापाठीमागे कोणाची ताकत आहे हे तपासण्याची गरज आहे.
तालुक्याच्या इतिहासाला कलंक लावणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध आहे व अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी योग्य ती कारवाई करावी आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेकडे गाभीर्याने पहावे आणि आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल अशी तरतूद करावी तसे आदेश येथील पोलीस प्रशासनास द्यावेत.
