Home महाराष्ट्र भगवतीदेवी विद्यालयात व्यंकटेश गुड्डेटवार यांनी विद्यार्थ्यांना वहीपेन देऊन केला वाढदिवस साजरा

भगवतीदेवी विद्यालयात व्यंकटेश गुड्डेटवार यांनी विद्यार्थ्यांना वहीपेन देऊन केला वाढदिवस साजरा

68

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.29ऑगस्ट):- रोज मंगळवारला सकाळी साडेअकरा वाजता भगवती देवी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात निसर्गरम्य वातावरणात राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत प्रतिज्ञा संविधान परिपाठ झाल्याबरोबर विद्यालयातील कर्मचारी श्री व्यंकटेश मारोती गुड्डेटवार यांचा पन्नासावा वाढदिवस विशेष म्हणजे (सुवर्ण महोत्सवी वर्षात त्यांनी पदार्पण) केले.

व्यंकटेश गुड्डेटवार म्हणजे सदाबहार आनंदी व्यक्तिमत्व हजर जवाबी प्रत्येकाचा सन्मान करणारे आहेत भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना बालकवर्ग आवडीचा होता त्याप्रमाणे गुड्डेटवार विद्यार्थ्यांच्या आवडीचे आहेत. व सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या आनंदात त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक वहीपेन भेट दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुड्डेटवार मामाचीच चर्चा होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सर्व कर्मचारी मंडळींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या वाढदिवसाच्या प्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे गौतम वाठोरे दिगंबर माने शेख सत्तार राजेश सुरोशे अनिल आल्लडवार भागवत कबले सौ. मीनाताई कदम मॅडम पांडुरंग शिरफुले विष्णू चव्हाण भागवत जाधव यांची उपस्थिती होती. अतिशय आनंदमय वातावरणात विद्यालयात वाढदिवस साजरा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here