बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे 51लक्ष विकास कामाचे उद्घाटन झाले आहे वेगवेगळ्या शासकीय समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपचे पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी उद्घाटक व मुख्य अतिथी म्हणून बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले व संयोजक,भारतीय जनता पक्षाचे गणेश मुंढे भुमिका घेतली व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे गोरगरीब शोषित वंचित निराधारांच्या सर्वांगीण विकासाचे विचार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजना वडगाव ढोक चे गणेश मुंढे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.याचाच एक भाग म्हणून बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नामुळे 2515 योजनेतून गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे 51 लाख रुपये मंजूर झाले आहेत.या कामाचे उद्घाटन सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता करण्यात आले असून या निमित्ताने पदाधिकारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला जिल्ह्यातील मुलभूत सुविधा संदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांच्या सोबत गणेश मुंढे यांनी सविस्तर चर्चा करण्यात येणार आल्या आहेत कार्यक्रमासाठी भाजपचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.देवीदास नागरगोजे,भाजपचे गेवराई तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे,संजयगांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष जे.डी.शहा,भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भूषण पवार,भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव,जिल्हा उपाध्यक्ष छगन पवार,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पवार,बंजारा क्रांती दलाचे बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, भाजपचे युवा नेते बाळासाहेब सानप,अँड.ज्ञानेश्वर खाडे, बंडूभाऊ बारगजे,पं.स उपसभापती संदिप लगड,सदस्य प्रा.शाम कुंड,सरपंच बाळू राठोड,उपसरपंच प्रशांत गोबरे यांच्या सह गेवराई तालुक्यातील वडगाव ढोकचे सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत.
खा.प्रितमताई मुंडे पहिल्यांदाच वडगाव ढोक मध्ये आल्या आहेत म्हणून त्यांच्या स्वतःच्या जय्यत तयारी करण्यात आली आहे.वडगाव ढोक फाटा गावापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे.
तरी सदरील उद्घाटन सोहळा, सत्कार समारंभ गेवराई सह बीड जिल्ह्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकजूट दाखवावी असे आवाहन गणेश मुंढे यांनी केले आहे.
