Home महाराष्ट्र शिवप्रतिष्ठान सभामंडप मंगलकार्याचे बाबाराव कदमच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

शिवप्रतिष्ठान सभामंडप मंगलकार्याचे बाबाराव कदमच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

86

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.29ऑगस्ट):-साखरा ता. उमरखेड येथे जि. प.शाळेच्या खुल्या जागेसमोर 20बाय 12 चे शिवप्रतिष्ठान (वधूवरांच्या स्टेजचे) बांधकाम भूमिपूजन बाबाराव सदाशिव कदम (थोटे) चालगणीकर यांच्या शुभहस्ते झाले. या बांधकामाकरिता लागणारा निधी स्वतः बाबाराव कदम करणार आहेत. त्यासाठी त्या शिवप्रतिष्ठान सभामंडपाला त्यांच्या आईची आई स्वर्गीय श्रीमती गिताबाई नरोजी वानखेडे साखरा यांचे नाव देण्यात येणार आहे. बाबाराव कदम यांचे लहानपणी पालन पोषण त्या मातोश्रीने केले आहे. त्याची जाणीव ठेवून तथा कृतज्ञता म्हणून हे कार्य करत आहेत. व अशा महान कार्याची सुरुवात त्यांनी केली.

यापुढे शिवप्रतिष्ठान मंगल कार्य पूर्ण होण्यासाठी इतरही दानदात्यांनी समोर यावे असे आव्हान साखरा येथील ग्रामस्थांनी केले आहे. कारण गोरगरीब सामान्य समाज हितासाठी ही वास्तू उभी होत आहे. आजकाल ग्रामीण भागातील गोरगरिबांचे लग्नकार्य करण्यासाठी प्रत्येकाला उमरखेड येथे येने शक्य नाही. किंवा तेवढा खर्च झेपत नाही ही एक सुरुवात ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बाबाराव कदम यांनी करून दिली आहे. त्याबद्दल साखरा येथील ग्रामस्थांनी बाबाराव कदम यांचे आभार मानले हे तेवढेच खरे म्हणावे लागेल.

यावेळी साखरा येथील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पाटील वानखेडे ग्रामस्थ सुदर्शन पाटील शामराव पाटील नारायणराव पाटील निवृत्ती पाटील बाळासाहेब पाटील विठ्ठलराव पाटील संभा पोफळे नागेश पाटील दत्ता पाटील बालाजी शिंदे बारकू पाटील आडेकर साहेब ज्ञानेश्वर माऊली आशिष पाटील लक्ष्मण हिंगडे किसन हिंगडे सुरेश हिंगडे सरपंच ज्योती दवणे उपसरपंच नंदा दवणे समाधान पहुरकर प्रकाश वानखेडे विकास पाटील विशाल कदम अशोक पहुरकर विवेक वानखेडे शिवाजी वानखेडे साहेबराव पाटील पप्पू सावंत दत्ता वरुडकर डॉ. साईली शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या) व विशेष छत्रपती शिवाजी राजे मित्र मंडळ साखरा येथील अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांची आवर्जून उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here