Home महाराष्ट्र अपघातात थोडक्यात मुलगी बचावली पण पायाला दुखापत

अपघातात थोडक्यात मुलगी बचावली पण पायाला दुखापत

135

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 नागभीड(दि.26ऑगस्ट):- नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील आंगनवाडी येथील मुलगी दिव्यांती शरद कुंभरे हीचा अपघात झाला माञ अपघातात पायाला जखम झाली. थोडक्यात ही मुलगी बचावली. म्हसली येथे पट असल्याने कोटगांव मार्गाने चारचाकी, दुचाकी जात असतात. सर्व वाहने गावातुनच जात असतात. गावातुनच मार्ग असल्याने वाहने दुसऱ्या मार्गाने जात नाही. याच मार्गाला लागुन जि.प.शाळा व दोन आंगनवाडी आहेत. यामध्ये लहान लहान मुले शिकायला जात येत असतात. तसेच आंगणवाडीतील मुले सुद्धा केव्हाही बाहेर येत असतात. आंगनवाडीमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे बगायला मिळते.

अधिकारी वर्गाचा दबाव नसल्याने नियोजन शुन्य काम आहे. येण्याजाण्याचा वेळ नाही. असे नियोजन शुन्य काम आहे. अपघातग्रस्त मुलगी ही खिचडी खाऊन बाहेर निघाली. पट सुरु असल्याने गाड्यांचा येजा सुरु होता. अशातच ही मुलगी एका दुचाकीला आपटली. आणी रोडवर पडल्याने पायाला दुखापत झाली. माञ चिमुकलीच्या वेदनानी मन भरुन येत होत. आंगणवाडी येथील सेविंकाचे दुर्लक्ष असते. अनेकदा मुलं बाहेर असतात तर सेविका आत मध्ये असतात. याकडे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी नागरीकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here