Home महाराष्ट्र बाळदी येथील महिलांना सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून द्या

बाळदी येथील महिलांना सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून द्या

145

(‘प्रहार’जनशक्ती पक्ष,बाळदि यांनी दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो;-9823995466

उमरखेड (दि. 25 ऑगस्ट):-सद्या स्थितीला पावसाळा जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे गावात भरपुर चिखलमय स्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील महिलांना घरी शौचालय उपलब्ध नसल्यामुळे सध्य परिस्थीतीला शौचालयास जाण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पुर्वी त्यांना गावाच्या बाहेर अधिकृतपणे ग्रामपंचायतने शौचालयाची जागा अधिकृत दिलेली आहे.

पण आता त्या जागेवर गावातील नागरीकांनी अतिक्रमण केल्या असल्यामुळे महिलांना आता दुसरीकडे शौचालयास जाण्यास खुप नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

उघडयावर शौचास बसत असल्यामुळे गावातील परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. नागरीक व महिला आजारी पडत आहे.

तरी आपण शौचालय अनुदान योजने अंतर्गत गरीब कुटूंबाना शौचालय किंवा बांधण्यासाठी अनुदान देण्याची यावी, यावेळी निवेदन देतांनी प्रविण इंगळे (बाळदी शाखा प्रमुख), अविनाश दुधे,नितीन राठोड,प्रफुल वानखडे,प्रविण गिरी,विवेक जळके(प्रसिद्धी प्रमुख) इत्यादी उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here