Home महाराष्ट्र पार्डी परिसरात कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव

पार्डी परिसरात कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव

60

🔸कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25ऑगस्ट):- तालुक्यातील पार्डी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली आहे .या कपाशी पिकावर गुलाबीबोंड आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

पार्डी, निंबी , गणेशपुर ,गाजीपुर येथील शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकारी पुसद व तालुका कृषी अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस पिकावरील एकात्मिक गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन करण्यात आले.अंड्यातून निघालेली अळी पाते कळ्या फुले बोंङात शिरून त्यावर उपजिवीका करते.व बोंड गळून खाली पडतात आळी बोंडातील बिया खाते व रुईची प्रत खालवते.व सरकीच्या तेलाचे प्रमाण कमी होते.

आपल्या शेतातले निरीक्षण करावे किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर फवारणी करावी तसेच विविध योजनेची माहीती व मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र सांगवी (रेल्वे) येथील ङाँ.विपुल वाघ. कृषी शास्त्रज्ञ ङाँ.हिवरे सर.उपविभागीय कृषी अधिकारी पुसद एस. आर.धुळधुळे. तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे. मंडळ कृषी अधिकारी विकास गवई. कृषी प्रवेक्षक सुरेश सुर्य. कृषी सहाय्यक अनिल करे.जे.बी.दिक्षित. यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here