Home पर्यावरण जागर योजनांचा-गावठाण स्वामित्व योजना

जागर योजनांचा-गावठाण स्वामित्व योजना

65

गावठाण जमाबंदी स्वामित्व योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात दि. १३ जानेवारी २०२२ पासून ड्रोनद्वारे गावठाण मोजणीची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १,३३३ गावात ड्रोनद्वारे गावठाण सर्व्हे करण्यात आले. तर आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३५४ गावात गावठाण चौकशीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

३३४ गावांपैकी ३३१ गावांचे अंतिम नकाशे एसओआय (SOI) कडून प्राप्त झाले आहेत. प्राप्त अंतिम नकाशांमध्ये ३१४ गावांचे चौकशी नोंदवही तयार करून नकाशांची सनद व आखीव पत्रिका तयार करण्याकरीता एसओआयकडे सादर करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण ४२ हजार ३५५ मिळकत पत्रिका तयार झालेल्या आहेत. सदर मिळकत पत्रिकांचा डाटा ई-पीसीआयएस (ए-लिळी) कडे पाठविण्यात आला आहे. तयार झालेल्या मिळकत पत्रिकेच्या आधारे एसओआयकडून सनद तयार करण्यात येते. तालुक्यांकडून गावाचे परीरक्षण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यास जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, चंद्रपूर कार्यालयाकडून गाव परिरक्षण घेण्यास मंजुरी देण्यात येते. मंजुरी प्राप्त झाल्यानंतरे गावातील मिळकत धारकांना सनद (अनुसूची – क) (कलम १२९ व १३० पाहा) वितरित करण्यात येतात. सनद व मिळकत पत्रिका तसेच नकाशा हा अधिकार अभिलेख स्वामित्व योजनेअंतर्गत तयार करण्यात येतात. सदर मिळकत पत्रिका https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर सर्वांना पाहता येतात.

यंत्रणा : जिल्हा अधिक्षक, भुमि अभिलेख कार्यालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here