अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.23ऑगस्ट):-चांद्रयान आज सायंकाळी चंद्रावर ऊतरणार आहे. भारताची ही महत्वाकांक्षी योजना यशस्वी व्हावी, यासाठी गंगाखेड येथे पुजा-प्रार्थना करण्यात आली. येथील सुप्रसिद्ध कलाकार विश्वनाथ कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, साईसेवा प्रतिष्ठानचे सचिव नागेश पैठणकर, लॉयन्स क्लब गोल्डसीटीचे अध्यक्ष श्रीधर जोशी, आर डी भोसले, लक्ष्मीकांतराव खळीकर आदिंच्या प्रमुख ऊपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
विश्वनाथ कांबळे यांनी साकारलेल्या चांद्रयान प्रतिकृतीसोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सुमित कांबळे, अमित कांबळे, प्रकाश कुलकर्णी, अभिजीत पुरनाळे, रत्नाकर कुलकर्णी, सोपान वाकळे, भोकरे आदिंनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.