




✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
🔸प्रा.हरी नरके यांचे विचाराचे पाईक म्हणून कटगुणचे गोरे यांनी या सत्यशोधक विवाहात जागर केला हे महत्वाचे आहे– मा.आ.शिषिकांत शिंदे
🔹फुले एज्युकेशन तर्फे 46 वा मोफत सत्यशोधक विवाह सोहळा निढळ येथे संपन्न झाला !!!
म्हसवड(दि.23ऑगस्ट): – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फ सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व जेष्ठ विचारवंत सत्यशोधक प्रा.हरी नरके यांचे स्मृतीप्रित्यर्थ मंगळवार दि.22 ऑगस्ट 2023 रोजी दू.3 वाजता सत्यशोधिका कोमल उमेश शेवते, सातारा आणि सत्यशोधक किशोर सुधीर गोरे , कटगुण यांचा 46 वा मोफत सत्यशोधक विवाह सोहळा सौभाग्य मंगल कार्यालय, निढळ,सातारा येथे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वधू वर आई वडील मामा मामी आमदार शिंदे यांनी आंबा, जांबुल, चिक्कू, वड,पिंपळ,सोनचाफा नारळ या वृक्षांना पाणी घातले.
या विवाह निमित्ताने हे वृक्ष घरी लावणार असून फुले दांपत्य यांचे ग्रंथ वाटप करीत फुले दाम्पत्य यांच्या पुतळ्यास किशोर आणि कोमल यांनी पुष्पहार अर्पण केला तर संत सावता महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिवीर उमाजी नाईक, शाहीर अण्णाभाऊ साठे, प्रा.हरी नरके यांच्या प्रतिमांना मान्यवर यांनी हार घालून भारताचे राष्ट्रीय ग्रंथ संविधान व महात्मा फुले यांचे स्मग्रा वाडमय यांचे पूजन केले.
या विवाह सोहळ्याची सुरवात माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी दीप प्रज्वलन करून केली.यावेळी खटाव कोरेगाव चे आमदार यांच्या पत्नी प्रियांका महेश शिंदे आणि माण चे आमदार जयकुमार गोरे यांच्या वहिनी भारती अंकुश गोरे,सातारा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते, कटगुणचे पोलीस पाटील जयश्री गोरे,सरपंच जयदीप गायकवाड, समाजसेवक डॉ. कर्णे दाम्पत्य उसस्थित होते.
याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की माझ्या मस्तकावर फुले पगडी परिधान केली याची उतराई होण्यासाठी मी कायम फुले दाम्पत्य याच्या विचाराने कार्य करणारच तसे आम्ही शरद पवार यांच्या सोबत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा कायम प्रसार करीत आहोत.आज गोरे यांनी प्रा.हरी नरके यांची प्रतिमा ठेवून त्यांच्या विचाराचे पाईक आम्ही आहोत हे या सत्यशोधक विवाह प्रसंगी सर्वांना दाखविले आहे.खरेच नरके यांनी फुले दाम्पत्य आणि ओबीसी समाजासाठी मोठे कार्य केले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी असे देखील शिंदे म्हणाले.
प्रदीप विधाते यांनी देखील या परिसरात प्रथमच हा सत्यशोधक विवाह गोरे आणि शेवते हे लावत असल्याने परिवाराचे अभिंनदन करीत सर्वांनी हा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.हा विवाह महात्मा फुले याना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने विधिकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी रजिस्टर नोंदणी करून महात्मा फुले यांच्या वेशभूषेत नेहमीप्रमाणे लावला तर महात्मा फुले रचित मंगलाष्टके चे गायन प्रा. सुदाम धाडगे आणि हनुमंत टिळेकर यांनी केले.
यावेळी वधू वर यांना फुले एज्युकेशन तर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम आणि सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आमदार शशिकांत शिंदे व अध्यक्ष ढोक यांचे शुभहस्ते दिले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आईवडील ,मामा मामी यांचा सन्मान पत्र मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मान केला.. तसेच संस्थेचे वतीने आमदार शिंदे यांना देखील फुले दाम्पत्य फोटोफ्रेम आठवण म्हणून भेट दिली.यावेळी अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला. आणि आलेल्या सर्व मान्यवर आणि महिलांना फुले दाम्पत्य यांचे 150 ग्रंथ भेट दिले. हा सत्यशोधक या परिसरात प्रथम होत असल्याने हजारोंचे संख्यने जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे आयोजक प्रा.सुधीर गोरे आणि समाजसेवक उमेश शेवते यांनी कर्मकांड,अंधश्रध्दा याला तिलांजली देऊन हा प्रबोधनात्मक सत्यशोधक विवाह लावला याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आणि हाच विवाह योग्य असल्याचे अनेकांनी मते नोंदवून आलेल्या पाहुण्यांनी आम्ही सत्यशोधक पद्धतीने यापुढे विवाह लावू असे देखील जाहीर केले.

