Home बीड गेवराई पंचायत समितीत चार विभागाला कुलूप; बीडीओसह अनेक अधिकारी, कर्मचारी गैरहजर

गेवराई पंचायत समितीत चार विभागाला कुलूप; बीडीओसह अनेक अधिकारी, कर्मचारी गैरहजर

103

🔹आ.लक्ष्मण पवारांचे स्टिंग ; मुख्य दरवाजा बंद करत सर्व विभागाच्या रजिस्टरची केली तपासणी

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)9075913114

बीड(दि.23ऑगस्ट):;गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई पंचायत समितीच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी येत असल्याने या तक्रारीची दखल घेऊन आ. पवार यांनी गेल्या दहा दिवसांत
आ. लक्ष्मण पवारांकडून तीनवेळा आढावा बैठक घेऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. यानंतरही निगरगट्ट अधिकारी जुमानत नसल्याने आज सकाळी साडेदहा वाजता थेट पंचायत समिती कार्यालय गाठले व प्रथम सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेऊन तपासणी केली. दरम्यान या कार्यालयात पंचायत समिती विभागात फक्त १० कर्मचारीच उपस्थित होते. तर गटविकास अधिकाऱ्यासह अनेक जण गैरहजर असल्याचे आढळून आले…

गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीची दखल घेऊन आ. पवार यांनी चांगलेच लक्ष घातले असून दर दोन दिवसाला त्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेत संबंधितांना कार्यालयात बसून नीट कामे करा, नियमात असलेल्या कुठल्याच लाभार्त्याची अडवणूक करू नका आशा सूचना दिल्या होत्या. परंतु तरीही या विभागातील अनेक अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने आज दि. २२ रोजी सकाळी १०:३० वाजता आ. लक्ष्मण पवार यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात जाऊन थेट मुख्य दरवाजे बंद करून आतमध्ये सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये मुख्य पंचायत समिती विभागातील एकूण ३६ पैकी फक्त १० कर्मचारी उपस्थित होते.

तर या अंतर्गत असलेल्या बालविकास प्रकल्प एक व प्रकल्प दोन या विभागात तीन-तीन पैकी प्रत्येकी दोन, शिक्षण विभागात फक्त दोन, बांधकाम विभागात १८ पैकी फक्त तीन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एकूण पाच पैकी फक्त तीन असे कर्मचारी आढळून आले तर बाकीच्यांनी कुठलीही कार्यालयीन रजा न टाकता दांडी मारल्याचे आढळून आले. तर स्वच्छ भारत, पंचायत, नरेगा आणि घरकुल विभाग या कार्यलयाला ११ पर्यंत कुलूप असल्याचे आढळून आले. दरम्यान या ईतर सर्व विभागाच्या हजेरी रजिस्टरच्या तपासण्या करून त्यावर लाल सहीने टिपणी करत या सर्व रजिस्टर कॉपी ताब्यात घेऊन याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कार्यवाही करणार असल्याचे यावेळी आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले. गैरहजर अधिकान्यांचा सविस्तर अहवाल ग्रामविकास मंत्र्यांना देऊन कडक कारवाईची

मागणी करणार- आ. पवार गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या कामकाजाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन मी दि.८ ऑगस्ट रोजी पहिली बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना नियमात असतील त्या लाभात्यांची अडवणूक न करता सर्व कामे तात्काळ मार्गी लावा आशा सूचना दिल्या, यानंतर मी दर दोन दिवसाला बैठक घेऊन आढावा घेत या सर्वांना वारंवार समज देऊनही अनेकजण कार्यलायच्या वेळेत हजर नसतात, जनतेची कामे वेळेवर करत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज सकाळी मी ठीक साडेदहा वाजता या कार्यालयाचे स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले त्यानुसार पंचायत समिती कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी ९:४५ ची असताना मी साडेदहा ला कार्यालयात आलो तेव्हा कार्यालयीन प्रमुख गटविकास अधिकारी व यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळुन आले तर अंतर्गत असलेल्या चार विभागाच्या दालनाला अकरा पर्यंत कुलुप असल्याचे दिसून आले. मात्र याबाबत मी सर्व विभागाच्या रजिस्टर नोंदी तपासून याबाबत एक अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here