केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले आणि यवतमाळ जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
यवतमाळ (दि.23 ऑगस्ट) तालुयातील मौजे चिंचोली (संगम) येथे पैनगंगा व कयाधू या दोन नद्यांचा संगम असल्यामुळे येथील नद्यांना पूर येऊन चिंचोली (संगम) या गावाचा उमरखेड तालुका सोबत संपर्क तुटतो.चिंचोली (संगम) या गावाला चारी बाजूने पाण्याचा वेढा असते.
येथे सन 2006 मध्ये सर्व दलित वस्तीमध्ये पाणी आले होते त्यामध्ये दलित वस्तीतील नागरिकांच्या घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
1983 मध्ये सुद्धा असच गावामध्ये पाणी येऊन घरांचे नुकसान झाले होते.चिंचोली (संगम) येथे नद्या मुळे व नद्याला येणाऱ्या पुरामुळे चिंचोली संगम या गावाचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आहे.
सदरील गाव रेड झोन मध्ये असते. त्यामुळे दलित वस्तीचे पुनर्वसन करावे…! अशा मागणीचे निवेदन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांना निवेदन देण्यात आहे. तसेच जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना सुद्धा निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमेधभाऊ नवसागरे, सामाजिक कार्यकर्ते रतन नवसागरे, रवी शेळके, रामा खडसे, मोतीराम नवसागरे, पंजाब नवसागरे, कैलास खडसे, पुण्यरथाबाई नवसागरे, गयाबाई नवसागरे, भारतबाई नवसागरे, रुख्मिनाबाई नवसागरे, शोभाबाई कदम, नंदाबाई कांबळे, नीलाबाई नवसागरे इत्यादी उपस्थित होते.




