Home महाराष्ट्र छगन भुजबळांना कानात शिसे ओतून मारा !

छगन भुजबळांना कानात शिसे ओतून मारा !

137

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

राज्यातल्या सत्ता तिघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच “देवी सरस्वतीने कुठे शाळा काढल्या,” असा प्रश्न उपस्थित करतानाच, “ब्राह्मणांच्यात शिवाजी, संभाजी नाव ठेवले जात नाही !” असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर राज्यातील ब्राह्मण समाज चांगलाच खवळून उठला. ‘परशूराम संघा’च्या कुणी देशपांडे नामक महाशयाने “भुजबळांच्या कानाखाली मारा, एक लाख बक्षिस देतो !” असे म्हटले आहे. यावर भुजबळ ज्या कंपूत वावरतात, त्यातल्या कुणीच प्रतिक्रिया देताना दिसत नाही. भुजबळ एकाकी पडलेले दिसताहेत. त्यांच्या बदलत्या भूमिकांमुळे त्यांचीही विश्वासाहर्ता राहिलेली नाही; पण तरीही त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे गैरलागू ठरत नाहीत.

खरेतर, छगन भुजबळांना या गुन्ह्यासाठी निव्वळ कानाखाली मारणे फारच कमी वाटतंय. अनेक वर्षे मंत्रिपद भूषवणार्या छगन भुजबळांना इतकी किरकोळ शिक्षा का व कशासाठी द्यावी ? भुजबळांचा गुन्हा खूप मोठा आहे. त्यासाठी देशपांडे आणि त्यांच्या परशूराम संघाने छगन भुजबळांच्या कानात शिसे ओतावेत, त्यांची चामडी सोलावी, त्यांचे डोळे काढावेत. हाल हाल करून त्यांचा ‘मनूस्मृती’च्या कायद्यानुसार त्यांचा जीव घ्यायला हवा. हे देशाचा विद्यमान राजा हा परशूराम विचारधारेला मानणारा असल्याने नाही. त्यांच्या आशीर्वादाने शंबूक मारला किंवा छत्रपती संभाजी राजेंना मारले; तसेच छगन भुजबळांनाही मारायला हवे. ‘एखादी कानाखाली द्यावी,’ ही ब्राह्मणी गंमत खूपच किरकोळ आहे. इतकी मामुली सजा भुजबळांना देणे योग्य नाही! त्यातही ती परशूरामाचे नाव असलेल्या संघाने इतकी फालतू सजा घोषित करणे, हा साक्षात परशूरामाचाच अवमान आहे.

परशुरामाने ज्या पध्दतीने क्षत्रिय नष्ट केले; गर्भार महिला मारल्या; त्यांच्या पोटातील बालकांचाही अजिबात विचार न करता, क्षत्रिय महिलांचा नायनाट केला; तसेच छगन भुजबळांचेही करायला हवे, अशी अपेक्षा का बरे ठेवायची नाही? परशूरामाचे नाव धारण करणाऱ्या संघटनेने निव्वळ कानफडात मारण्याचे फर्मान काढावे; हे परशूरामाच्याच लौकीकाला शोभत नाही. खुनी मर्दांनो, किमान महाक्रूरकर्मा नथुराम गोडसे तरी आठवा; आपल्यात जागवा! ह्या आर्जवाचा ‘परशूराम ब्राम्हण संघा’ने आणि देशपांडेनी पुनर्विचार करावा आणि त्या पध्दतीची सुपारी द्यावी.

अशी सुपारी ‘नाटक्या नथुराम’ शरद पोंक्षे मार्फत दिली तरी काही बिघडणार नाही. राज्याचा गृहमंत्री त्याच जातीचाच आहे. त्यांच्यातही ‘भीमा-कोरेगाव दंगल’फेम ‘भिडे-एकबोटे’ला मोकाट ठेवणारा जातीय अभिमान ठासून भरला आहे. हा गृहमंत्री आधी जातीचा; मग संघाचा; मग पक्षाचा; मग राज्याचा आहे. ते परशूराम संघाला ताकदच देतील, यात शंका नाही.

“ब्राह्मण जातीविरूध्द बोलण्याचे धाडस भुजबळ करूच कसे शकतात ?” हा वर्णवर्चस्वाचा जातीय अहंकार स्वर्गाला भिडलेल्या ‘परशूराम संघा’ने बिनधास्त भुजबळांच्या खांडोळ्या कराव्यात; त्यांची हाल हाल करून हत्या करावी. मात्र एक अट आहे. अशी ‘मनुस्मृती’निष्ठ हत्या करण्याआधी किंवा कानफटात मारण्याची ‘ब्राह्मणी गंमत’ करण्याआधी ‘परशुराम ब्राम्हण महासंघा’ने पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

*१)* सरस्वती विद्येची देवता आहे, तर तिने किती शाळा काढल्या होत्या ?
*२)* सरस्वती तमाम हिंदू समाजाची देवता आहे; तर तिने ब्राह्मण सोडून इतरांना शिक्षण का दिले नाही ?
*३)* सरस्वती स्वत: स्त्री असतानाही तिने ब्राह्मण स्त्रियांसाठी शिक्षण का खुले केले नाही ? त्यांच्यासाठी शाळा का काढल्या नाहीत ?
*४)* महात्मा जोतीराव फुलेंनी शाळा काढेपर्यंत बहुजन समाजाला शिक्षणाची वाट का पहावी लागली ?
*५)* सरस्वती तमाम हिंदूची विद्येची देवता असतानाही तिने शिक्षण एका जातीपुरतेच का मर्यादित ठेवले ?
*६)* बहुजनांना शिक्षण मिळण्यासाठी स्वातंत्र्याची आणि देशात संविधान लागू होण्याची वाट का पहावी लागली ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘परशूराम संघा’ने आधी द्यावीत. मग छगन भुजबळांवर सजेच्या बक्षिसाची भाषा करावी. धर्माचा आणि देवाचा मुद्दा पुढे करत भुजबळांनी विचारलेले प्रश्न बाजूला टाकू नयेत. ब्राह्मण महासंघाने जातीय अहंकार मातीत घालून समाज पुढे न्यावा. लोक बोलणार आणि प्रश्नही विचारणार. कारण ब्राम्हण जातीने इतिहासात तेवढ्या गंभीर चुका केलेल्या आहेत; तेवढेच पापही केले आहे! त्यात आत्ताच्या ब्राह्मण समाजाचा काही दोष नाही. त्यांचा काही गुन्हा नाही. पण म्हणून इतिहासातल्या या जातीय विकृत विष्ठेला ब्राह्मण समाजाने अभिमानाने कपाळावर मिरवावं का ? कुणी या पापावर बोट ठेवलं तर खवळून सुपाऱ्या द्याव्यात का? पुर्वजांनी केलेल्या चुका तुमच्या नाहीत ना? मग त्यावर बोलल्यावर तुम्हाला राग का येतो ? पुर्वजांनी केलेली चूक होती, ही घाण होती याचा स्विकार करून ब्राह्मण समाज त्यापासून दूर कधी होणार? पश्चाताप कधी व्यक्त करणार? ‘आमचे पूर्वज नालायक होते; त्यांनी नीचपणाचा कळस गाठला होता; त्यांनी माणूसपणाला लाज आणली होती, हे सत्य कधी कबूल करणार? की, हिंदुत्वाच्या पपांघरुणाखाली आपली ‘ब्राह्मणी कौर्य’ लपवत बसणार?

या देशाला आणि देशातल्या बहुजनी जनतेला ब्राह्मण जातीने जेवढे छळले-लुटले; तेवढे ना मोघलांनी, ना इंग्रजांनी लुटले! इतके भयंकर शोषण ब्राह्मण जातीच्या लोकांनी देवा-धर्माच्या नावे केले आहे. हा छळाचा, लुटीचा उघड इतिहास आहे; तो कुणालाही नाकारता येणार नाही. जसे लुटणारे, छळणारे होते तसे काही चांगले- ऐतिहासिक योगदान देणारेही ब्राह्मण होते. त्यांचा आदरच आहे. मात्र, इतक्या मोकळेपणाने शोषणाच्या वेदना सहन करणार्या बहुजन समाजाने कधीतर आपली वेदना मांडली तर ती स्वीकारली जात नाही. ती मोकळेपणाने स्वीकारत जातीय विद्वेष मातीत घालावा; माणूस म्हणून जगण्याची प्रक्रीया पुढे न्यावी; माणूसपणाला महत्व द्यावे; आव्हान-प्रतीआव्हान देत इतिहासातल्या विकृतीचे समर्थन करू नये; ही स्वत:ला सूज्ञ म्हणवून घेणार्या ब्राह्मण समाजाकडून अपेक्षित आहे. अन्यथा, इतिहासातली भुतं ब्राह्मणांच्या मानगुटीवर त्रिकाळ बसल्याशिवाय राहाणार नाहीत. लोक सत्य जाणतील तेव्हा प्रश्न विचारणारच! जर, “पूर्वजांनी पाप केलं, तर त्यात आमचा दोष काय?” असे म्हणत असाल, तर त्याचा अभिमान तरी का ठेवता ?

अखंड देशाचा, देशातल्या जात समुहाचा अभ्यास करता ब्राह्मण समाजाला जेवढी प्रगतीची संधी मिळाली; जेवढा लाभ मिळाला; सत्ता मिळाली; सरकार दरबारी मान-सन्मान-पदे मिळाली ; तेवढी कुणालाच मिळालेली नाहीत. या जातीच्या वाट्याला खूप कमी संघर्ष आला.

जो आला, तो स्वत:च्या चुकांनीच आला. या जातीने जात म्हणून इतिहासात संघटीत पाप खूप केलंय. तेवढं पाप इतर कुठल्याच जातीने केलं नाही. या सगळ्या इतिहासातील चुकांना खुल्या दिलाने स्विकारावे. या चुका मान्य करत आपल्या लोकांना माणूस म्हणून जगायला प्रवृत्त करावे. वर्तमानाचा धांडोळा घेतला तर ब्राह्मण समाज दिवसेंदिवस माणूसपणाच्या प्रक्रियेपासून लांब लांब निघाल्याचे दिसून येते. ह्याची साक्ष कुलश्रेष्ठ नथुराम शरद पोंक्षे याच्या वाढत्या ब्राह्मणी खोड्यांतून स्पष्ट दिसते. त्यांत जातीय अहंकार ठासून भरलेला दिसतोय. द्वेष, मत्सर, कारस्थानं, तिरस्कार या विकृत गोष्टींना तो परत परत कवटाळताना दिसतोय. जातीसाठी प्रतिकं निवडतानाही ते त्याच योग्यतेची निवडताहेत. ब्राह्मण संघाने आपल्या लोकांना माणूस व्हायला मदत करावी. तशीच प्रतिकं निवडावीत.

परशूरामाचे नाव जातीच्या संघाला देताना ब्राह्मण समाजाने आईची हत्या करणाऱ्या परशूरामाचे क्रौर्य स्वीकारले, असे का नाही म्हणायचे ? स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जगविख्यात माणूस ब्राह्मण जायची जन्माला आला. संत ज्ञानेश्वर यांच्यासारखा माणूस जन्माला आला. बाबा आमटेंसारखा समाजसेवक जन्माला आला. त्यांची नावे ब्राह्मण महासंघ आपल्या संघटनेला का देत नाही ? या जातीने विवेकानंद स्वीकारले; बाबा आमटे स्वीकारले तर तो मानवतेचा प्रवास होईल. परशूरामाची निवड केली तर पुन्हा त्याच ऐतिहासिक विकृतीला कवटाळल्यासारखे होईल. ब्राह्मण समाजाने व त्यांच्या संघटनेने आपल्या लोकांना माणूस व्हायला, मानवता धर्म पाळायला प्रवृत्त करणे, ही खरी गरज आहे. सगळी संधी असताना, सगळी परिस्थिती अनुकूल असताना समाजाची अमानुषतेकडे वाटचाल होत असेल तर गंभीर बाब आहे. अशाला ‘काळ माफ करीत नाही,’ हे सत्य आहे.

छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे महत्त्वाचे असले तरी त्याची मांडणी परिपूर्ण नाही. ‘विद्यादेवी’ सरस्वतीने एकही शाळा काढली नाही; हे खरेच! त्याच बरोबर ‘विद्यापती’ गणेश देवांनी एकही महाविद्यालय-विद्यापीठ का काढलं नाही, हाही प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे होता. तसेच, अमरावती येथील ‘तपोवन’ ह्या कुष्ठरोगी पुनर्वसन केंद्राच्या संस्थापकाचे नाव *शिवाजीराव पटवर्धन* असे होते; आणि ज्येष्ठ नाटककार-संपादक व शिवसेनेचे खासदार झालेले दिवंगत *विद्याधर गोखले* यांच्या वडिलांचे नाव *संभाजीराव* होते. भुजबळांना ह्याचे विस्मरण मनोहर भिडेच्या नावातील बोगसगिरीमुळे झाले असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here