Home महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजना जिल्हा यवतमाळ मध्ये उमरखेड तालुका प्रथम…

प्रधानमंत्री आवास योजना जिल्हा यवतमाळ मध्ये उमरखेड तालुका प्रथम…

107

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 23 ऑगस्ट):- अमृतमहा आवास अभियान 2022-23 मधील उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामपंचायती व तालुक्यास मा. संजयभाऊ राठोड, पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांच्या मार्फत दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले.

त्यामध्ये उमरखेड तालुक्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करिता प्रथम पुरस्कार श्री प्रविणकुमार वानखेडे, गट विकास अधिकारी पं. स. उमरखेड व घरकुल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला.

तसेच राज्यपुरस्कृत योजने करिता 1) टाकळी ई. या ग्रामपंचायतीस प्रथम, वानेगांव ग्रामपंचायतीस व्दितीय पुरस्कार मिळाला तर प्रधानमंत्री आवास योजने करिता ग्रामपंचायत निंगपुर ला तिसरा पुरस्कार मिळाला आहे तसेच जिल्हा परिषद गट दराटी यास प्रथम पुरस्कार मिळाला असे एकूण उमरखेड तालुक्यास 5 पुरस्कार मिळाले आहे.

उमरखेड तालुक्यात अभियान काळात म्हणजेच 20 नोव्हेंबर 2022 ते 30 जुन 2023 पर्यन्त प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकूण 2369 घरकुले पुर्ण केले आहे. तसेच राज्यपुरस्कृत योजने अंतर्गत 526 घरकुले पुर्ण झाली आहेत. यामुळे पंचायत समिती उमरखेडच्या बिडिओ प्रवीणकुमार वानखेडे यांच्या सह सर्व इतरही कर्मचाऱ्यांवर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here