Home महाराष्ट्र जेजुरी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत माणची सुवर्ण कामगिरी

जेजुरी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत माणची सुवर्ण कामगिरी

76

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸ए-वन मार्शल आर्ट च्या विद्यार्थिनींनी मिळवले यश

म्हसवड(दि.22ऑगस्ट):-शिवशंभो मर्दानी आखाड्याच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चॅम्पियनशिप २०२३ या राज्यस्तरीय लाटी काटी स्पर्धेमध्ये माण तालुक्याने 6 गोल्ड मेडल, दोन सिल्वर, दोन ब्रांच मिळवत दमदार कामगिरी केली. ए-वन मार्शल आर्ट अँड स्पोर्ट अकॅडमीच्या दहा विद्यार्थिनींनी आपल्या माण तालुक्याचे नाव राज्यात रोषण केले आहे.

माण तालुका हा बुद्धिवादी लोकांसोबत कलावंतची खाण आहे. माणच्या मातीत पाण्याचे दुर्भिक्ष असले तरी बुद्धीचा तुटवडा कधीच भासला नाही. माण तालुक्याने राज्य, देश आणि जागतिक पातळीवर हे वेळोवेळी सिध्द केले आहे.

जेजुरी येथे झालेल्या या मोठया स्पर्धेत समृद्धी मोरे, सेजल गोंजारी , तनिष्का गायकवाड, रिया वायदंडे, प्राची जाधव, गौरी जाधव, समृद्धी भुजबळ, स्वरा स्वामी, ईश्वरी स्वामी, ऋतुजा तांबे या विद्यार्थिनी आपला दमदार खेळ दाखवत पदकांची कमाई केली. या माणच्या सुवर्णकन्यांनी आपल्या प्रतिस्पर्धकांना धूळ चारत पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

त्यांच्या या कामगिरीने माणची माण अजूनच उंच झाली आहे. या यशाबद्दल त्यांना माजी राष्ट्रीय खेळाडू, ए-वन मार्शल आर्ट अँड मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष व प्रशिक्षक नवनाथ भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांच्या विविध क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here