Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि नामविस्तार सोहळा’ उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि नामविस्तार सोहळा’ उत्साहात साजरा

56

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.21ऑगस्ट):- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी ‘कबचौउमवि नामविस्तार सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व  महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. के. एन. सोनवणे यांनी बहिणाबाई यांनी लिहीलेल्या विविध कविता सादर करून त्यांचा जीवनक्रम संक्षिप्त स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता चित्रफीतीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या.

याप्रसंगी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव नामविस्तार सोहळयानिमित्ताने ‘वृक्षारोपण कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील, कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा.डी. बी. देशमुख, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ व इतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात जवळपास ३०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. आर. पाटील यांनी केले तर आभार डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. ए. बी. सूर्यवंशी, गोपाल बडगुजर, एस. जी. पाटील, बी. एच. देवरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here