अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )
गंगाखेड(दि.20ऑगस्ट):- येथे माजी आमदार मा. सीतारामजी घनदाट मामा यांचा संपर्क कार्यालय गंगाखेड येथे बंजारा समाजाचे भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्येक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस मा.भरत घनदाट होते तर मुख्य अथिती म्हणून जिल्हाचे खासदार मा. संजय जाधव तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख मा. विशाल कदम होते तर यावेळी उपस्थित अभुदय बॅंकचे संचालक माधव ठावरे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव ढेले अप्पा उस्थित होते.
या मेळाव्यास मार्गदर्शन करताना खासदार संजय जाधव यांनी गंगाखेड मतदार संघातील तांडे वस्ती मध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोणासमोर निधी साठी झुकवे लागणार नाही मी त्यांना आत्मसान्माने गंगाखेड मतदार संघातील अकरा तांडे वस्तीना भरघोस विकास निधी देऊन विकास प्रवाहत आणण्याचे अभिवचन देत असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच त्यांच्या आक्रमक भाषण शैलेतून जिल्हाचे पालक मंत्री मा. तानाजी सावंत तसेच गंगाखेड मतदार संघांचे आमदार रत्नाकर गुट्टे व जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर याच्यावर आरोप करण्यात आले, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी बाबत माहिती देत असताना खासदार संजय जाधव यांनी पालक मंत्री यांच्यावर आरोप करण्यात आले की विकासनिधी वाटपात भेदभाव करून केवळ सत्ताधारी आमदारांना मतदार संघात विकासनिधी देत विरोधकांच्या मतदार संघात एक रुपया न देन्याचे पाप पालक मंत्र्याने केले आहे. पालक मंत्री हे केवळ टक्केवारी साठी जिल्हात येतात आसे आरोप खासदार संजय जाधव यांनी केले आहे.
