




✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )
गंगाखेड(दि.20ऑगस्ट):/तालुक्यातील खादगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची103 वी जयंतीमोठया उत्साहात साजरी करण्यात अली या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रामराजे फड तर प्रमुख पाहुने दिलीप फड जागीरदार उपसरपंच वैजनाथ व्हावळे अॅड उमाकांत फड, हरीभाउ फड, सोमनाथ फड, भगीरथ फड, राजेश सगट यांची उपस्थीती होती.
कार्यकम यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटी अध्यक्ष दशरथ जोगदंड, अंकुश जोगदंड, ज्ञानोबा जोगदंड, शिवाजी जोगदंड, बबन जोगदंड, दिगंबर कलिंदर, अंताराम कलीदंर यानी परीश्रम घेतले सुत्रसंचालन निलकंठ सिरसाठ सर तर आभार प्रदर्शन अनिकेत जोगदंड यांनी मानले.रामराजे फड,राहुल फड, हरीभाऊ फड,राजेश सगट यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विचार मांडले.

