Home महाराष्ट्र चिमुरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कार्यकर्ता अभ्यासवर्ग मेळाव्याचे आयोजन

चिमुरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कार्यकर्ता अभ्यासवर्ग मेळाव्याचे आयोजन

124

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमुर(दि.18ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा चिमुरच्या वतीने शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता अभ्यासवर्ग व चिमुर तालुका मेळावा दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी बालाजी रायपुरकर सभागृह पिंपळनेरी रोड चिमुर येथे आयोजीत केले आहे.

दिनांक २० ऑगस्टला शिक्षण कायदा १९७७ सेवाशर्ती नियमावली १९८१ (सेवाजेष्ठता), संघटना, कार्यकर्ता प्रबोधन व मार्गदर्शन, शासन निर्णयाचे अर्थपूर्वक मार्गदर्शन व जुनी पेन्शन योजना सध्यास्थिती, रजा नियम व कॉन्हेंट शिक्षकांच्या समस्या या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले असुन मान्यवर मार्गदर्शन करतील.

दुपारी १ वाजता होणा-या उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) चे अध्यक्ष विलास खोंड, उद्घाटक चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते एकनाथ थुटे, प्रमुख अतिथी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, अध्यक्ष अजय वानखेडे, कार्यवाह सुभाष गोतमारे, कोषाध्यक्ष संतोष सुरावार, उपाध्यक्ष विनोद पांढरे, मधुकर मुप्पीडवार, सहसंघटन मंत्री रामदास गिरटकर, कार्यवाह दिलीप मॅकलवार, कोषाध्यक्ष धनंजय बोरकर, पंचायत समिती चिमुरच्या गटशिक्षणाधिकारी वृषाली गड्डमवार, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद मिसे, विशेष अतिथी सेवानिवृत्त शिक्षक के. एस. बारापात्रे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र मोहीतकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्या गिरडकर, जिल्हा कार्यालयमंत्री विलास वरभे आदी मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका कार्यकारणी चिमुरचे अध्यक्ष प्रमोद धारणे, कार्यवाह परमानंद बोरकर, कार्याध्यक्ष निलकुमार पेचे, प्रभाकर समर्थ, उपाध्यक्ष दिलीप बोरकर, शैलेश वाघे, सहकार्यवाह मुस्तकीम पठाण, प्रभाकर पिसे, कोषाध्यक्ष विजय देवाडे, महिला आघाडी प्रमुख शितल पिसे, सदस्य विनायक ठाकरे, मिलींद मिसार, जितेंद्र मेश्राम, सुधीर सुकारे, मार्गदर्शक नरहरी कापसे, पुरुषोत्तम सोनवाने आदीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here