Home महाराष्ट्र मोर्शी तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळेतील ५५ वर्गखोल्या धोकादायक परिस्थितीत !

मोर्शी तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळेतील ५५ वर्गखोल्या धोकादायक परिस्थितीत !

66

🔹नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर करा !

🔸रुपेश वाळके यांनी दिला आंदोलनाचा ईशारा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.18ऑगस्ट):-तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी मुक्त मनाने जातात, परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते, परंतु शासन प्रशासनाला त्याचे काय? मोर्शी तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारातूनच विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केली आहे.

मोर्शी तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळांमधील ५५ वर्गखोल्या धोकादायक परिस्थितीत असून सुधा या ५५ वर्गखोल्या बांधकाम करण्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून जिल्हा प्रशासनाने मोर्शी तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळेच्या ५५ वर्गखोल्या पडण्याचे आदेश दिले आहे. या ५५ वर्गखोल्या पाडल्यास २० गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शेकडो विद्यार्थी यांना बसण्यासाठी पर्याई व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थी बसणार कुठे, शिक्षण घेणार कुठे तालुक्यातील २० शाळांमध्ये ५५ वर्गामध्ये कुठेही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार राहणार कोण? हा प्रश्न पालक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांना पडला असून मोर्शी तालुक्यातील ५५ वर्गखोल्या नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी प्राधान्याने तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केली असून मोर्शी तालुक्यातील ५५ वर्गखोल्या बांधकामासाठी निधी मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. शिक्षणाचा दर्जा सुधारावा विद्यार्थ्यांना सर्व सोई सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात, परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे मात्र शिक्षणाचा खेळखंडोबा होतो, तर कुठे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला जातो. मोर्शी तालुक्यातील अत्यंत शिकस्त असलेल्या दापोरी ८, डोंगर यावली ८, पाळा ४, खानापूर ३, चिंचोली गवळी ४, अंबाडा ५, नया वाठोदा ५, आष्टगाव ३, लीहिदा २, मयावाडी २, बेलोना २, रोहनखेड १, हाशमपुर १, वऱ्हा १, आसोना १, बऱ्हाणपूर १, धामणगाव १, पिंपळखुटा लहान १, बोंडणा १ अश्या २० जिल्हा परिषद शाळेतील ५५ वर्ग खोल्यांचे भीषण वास्तव असून या सर्व जिल्हा परिषद शाळा या उदासीन धाेरणाचे बोलके उदाहरण आहे.

मांडवा येथे कै.वसंतराव नाईक स्मृतीदिन साजरा

प्रस्ताव पाठवले पण निधी कधी उपलब्ध होणार ?
मोर्शी तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळेच्या ५५ वर्गखोल्या शिकस्त झाल्या असून नवीन ५५ वर्गखोल्या बांधकाम करण्याकरिता जिल्हा परिषदकडे अनेक वेळा पत्र पाठवून शिक्षण विभागाकडे सादर केले. या सर्व शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याकरिता जागेची कुठलीही अडचण नाही, मात्र त्यावर शासनाकडून प्रशासकीय यंत्रणेकडून निधी उपलब्ध करून देण्याची दखल घेतल्या जात नाही, मोर्शी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना भिंतीला तडे गेलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे ही शोकांतिका आहे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here