विशेष प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगाव(दि.17ऑगस्ट):-भारतीय बहुजनांच्या हितासाठी एखादा विचारवंत एखादा लेखक एखादा कवी ,नाटककार, प्रचार प्रसार करणारा कार्यकर्ता, राजकीय नेता समाजसेवेचा काम करणारा कार्यकर्ता समाज जागृतीचं काम करतात ते असं का करतात कारण देशात बहुजनांना दिशाहीन करणारी त्यांना गुलाम बनवणारी त्यांना अधिकार वंचित करणारी व्यवस्था जेव्हा कार्यरत असते तेव्हा स्वतःचा समाजाला भारतीय बहुजनांना जागृत करून त्यापासून मुक्त व स्वातंत्र्य साठी जे कार्य करतात त्याच्यात काहींचा इतिहास लिहिला जातो किंवा घडलेल्या घडामोडी हे सतत कार्यकर्ते लिहीत असतात आणि पुढे जाऊन तो इतिहास बहुजनांना दिशा देण्यासाठी प्रेरणादायी ठरतो.
त्यालाच आपण वारसा म्हणतो. गुलाम बनवणाऱ्यांचा आणि गुलाम होणाऱ्यांचा धर्म एक नसतो म्हणजे दोघांच्या संस्कृती भिन्न आहेत परंतु जेव्हा बहुजनांच्या हितासाठी जो कोणी हे कार्य करतो तो त्याच्या पुढे जे घडलेले महापुरुष असतो त्यांना आदर्श मानून त्यांच्या दिलेल्या दिशावर त्यांनी विचारावर काम करतो असे कार्य करणारे कार्यकर्ते जेव्हा कार्य करत राहतात आणि त्यांचा एक शेवट येतो निसर्ग नियमानुसार तो शेवट नंतर अर्थात कार्यकर्ता मेल्यानंतर त्याचे कुटुंब त्याची भावकी त्याचे कुळातील लोक जेव्हा दशक्रिया करतात ते दशक्रिया कोणत्या संस्कृतीने होते त्याच्यावर तो वारसा पुढे चालवलणार का नाही हे सिद्ध होते.
समाजाला अधिकार प्राप्त करण्यासाठी आणि गुलामीतून मुक्त करण्यासाठी ज्या वैदिक व्यवस्थाशी सतत संघर्ष करत राहतात समाजाला जागृत करत राहतात हे कार्यकर्ते ते महापुरुष यांच्या निधनानंतर उर्वरित ज्या विधी केल्या जातात त्या विधी जर मूळ संस्कृतीने झाल्यास तरच तो वारसा पुढे टिकेल नाहीतर ज्यांनी गुलाम बनवलेला आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात लढले त्याच व्यवस्थेची जर विधी होत असेल तर तो वारसा पुढे चालू शकत नाही राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा निधन झालं त्यांचे दशक्रिया सत्यशोधकाने झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण झाले त्याच्या नंतर भारतातल्या मूल विचार सत्य विचारला समोर ठेवून त्यांचा जलदान विधी कार्यक्रम झाला आणि त्याच पद्धतीने वर्तमान मध्ये आधुनिक भारताचा संशोधन करणारे ज्येष्ठ विचारवंत संशोधक यांचे सुद्धा निधनानंतर सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया होत आहे हा खरा वारसा ही खरी क्रांती आहे.
विचारांचा वारसा जोपासला पण संस्कृती मात्र जर वैदिक घेत असाल तर प्रतिक्रांती आहे. उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय. वारकरी संतांनी जी जागृती केली त्यांना छेडणारे त्यांचा छळ करणारे वैदिकच होते परंतु वारकरी मेल्यानंतर त्याच्या दशक्रिया जर वैदिक पद्धतीने होत असेल तर ही प्रतिक्रांती आहे महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार करणारे त्या विचारधारावर स्वतःचा आचरण करणारे जेव्हा शेवटी निधन होते आणि त्यांचे दशक्रिया दहा दिवसांनी होणारा कार्यक्रम जर वैदिकने होत असेल तर आयुष्यभर महानुभाव पंथाच्या विचारावर आचरण करणाऱ्या लोकांच्या जीवनात अर्थ नाही कारण का महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी व त्यांच्या अनुयायी यांना जर कोणी छळलं असेल तर वैदिकाने छळले आणि तीच वैदिक संस्कृती जर मेल्यानंतर स्वीकारत असाल तर ही प्रतिक्रांती आहे. वर्तमान महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर या नावाने अनेक संघटनांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत प्रचारक आहेत काही सर्व जाती समावेश जोडण्याचा काम करत आहे काही जाती पुरता काम करत आहे काही हरकत नाही तसाही तुम्ही फुले शाहू आंबेडकर ब्रँड घेतात त्याच्यावर समाजाला व्याख्यान देतात प्रचार प्रसार करतात नाटक तयार करतात.
कविता करता अशा कार्यकर्त्यांचा जेव्हा देहांत होतो अशा वेळेस ते ज्या गावी राहतात त्या गावाची त्यांचे नातेवाईक त्यांचे कुटुंब त्यांचा मेल्यानंतर दहा दिवसाचा कार्यक्रम जर वैदिक विधीने करत असाल तर आयुष्यभर ज्या महापुरुषांचे कार्य त्यांनी चालवलं त्याचा वारसा पुढे थांबतो तो पुढे जात नाही ही प्रतिक्रांती आहे. या सर्व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबाला आपल्या भावकीला सांगितलं पाहिजे की मी मेल्यानंतर माझा दशक्रिया हा सत्यशोधक पद्धतीने झाला पाहिजे किंवा जी मूळ संस्कृती असेल तिला धरून झाली पाहिजे हे असं सांगून गेलं पाहिजे सांगितलं तरच ते लागू पडेल अन्यथा नाही.
जसे उदाहरण जर तुम्हाला दिले तर एखादे नवरा बायको किंवा सिंगल व्यक्ती जेव्हा काशी नावाच्या तीर्थक्षेत्राला जातो आणि परत येताना नातेवाईकांना समाजाला सांगतो की मी काशी करूंन आलो. हे काम एवढ्यावरच थांबत नाही या काशी करून आलेल्या व्यक्तीचं काम त्याचे नातेवाईक त्याचे कुटुंब मेल्यानंतर सुरू करतात. माझा बाप माझी माय कशी गेली होती म्हणून आम्ही दशक्रिया करणार नाही तर आणि तेरावे करणार व त्या प्रेताला घेऊन जाण्यासाठी लाकडाची तिरडी तयार करणार. आणि ते तसे करतात ते प्रॅक्टिकल मध्ये आपण बघत आहोत. म्हणजे बघा वैदिक संस्कृतीने काशी नावाचा तीर्थक्षेत्र तयार केला आहे त्याला गेलेल्या व्यक्तीला मेल्यानंतर तुझं काय झालं पाहिजे की सिस्टीम तयार करून ठेवलेली आहे म्हणून वैद्यकांची क्रांती होते. आणि जर तुम्ही तसे केले नाही तर काशी लागू पडत नाही. ही संस्कृती कोणाला लागू पडते जे जे काशी करून आलेले हे त्यांना लागू पडते ज्यांनी काशी केलेली नाही त्यांना केवळ दशक्रिया करावी लागते.
दुसरे उदाहरण असे की एखादा व्यक्ती म्हणतो की मी मेल्यानंतर मला शेतामध्ये जाळा किंवा शेतामध्ये खड्डे करून त्या ठिकाणी मला बुजवा. म्हणून तो व्यक्ती मेल्यानंतर त्याचे कुटुंब त्याच पद्धतीने करते.
या उदाहरणातून काय कळते की ज्याला आम्ही वारसा म्हणतो तो जर पुढे चालवायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर यामध्ये काम करणारे तमाम परिवर्तनवादी कार्यकर्ते विचारवंत लेखक कवित्व करणारे कवी या नावाने चालवणारे राजकीय नेते या सर्वांनी आपल्या कुटुंबाला सांगणे गरजेचे आहे की मी या गुलाम बनवणाऱ्या वैदिक संस्कृतीच्या विरोधात समाजामध्ये अहो रात्र काम केलेला आहे त्या समाजामध्ये माझे कुटुंब देखील येते अर्थात तुम्ही. म्हणून मी मेल्यानंतर कोणत्याही पद्धतीने माझी दशक्रिया किंवा जी काही कार्य असेल ते सत्यशोधक पद्धतीने झालं पाहिजे किंवा आपली जी मूळ संस्कृती आहे त्यानुसार झालं पाहिजे कोणत्याही पद्धतीने माझ्या नंतर मला वैदिक संस्कृतीचा संस्कार नको.
विचार आणि संस्कृतीमध्ये फरक आहे.जसे फुले शाहू आंबेडकर या विचाराने काही कार्यकर्ते अहोरात्र काम करतात लेखक काम करतात पण त्यांच्या घरामध्ये वैदिक पद्धतीने संस्कार होतात म्हणजेच विचार वेगळे आणि संस्कृती वेगळी आहे समजा आम्ही विचाराचा वारसा जपला परंतु संस्कृती जर वैदिक ठेवली तर क्रांती वैदिकांची होणार आणि गुलामी आमच्या वाट्याला येणार म्हणून असं काम करणारे कार्यकर्ते लेखक कवी विचारवंत यांचा वारसा पुढे टिकत नाही. परंतु संस्कृती निरंतर काम करते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनेक लोक सत्यशोधक होते आज त्यांच्या कुटुंबात तो विचार थांबला आहे आणि आज त्यांचे कुटुंब वैदिक संस्कृतीमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर सर्व संस्कार आणि विधी करत आहे. याचा अर्थ काय विचार थांबले पण संस्कृती निरंतर पुढे गेली. फुले शाहू आंबेडकरांचा परिवर्तनवादी विचार थांबला पण वैदिक संस्कृती निरंतर पुढे केली. म्हणून देशामध्ये वारंवार क्रांती आणि प्रतिक्रांती का होते ती केवळ आणि केवळ संस्कृती मुळे.
पुन्हा संस्कृती आणि परिवर्तन मध्ये फरक पडतो. जशी उदाहरणार्थ बौद्ध बांधव आहेत .एखाद्या बौद्ध बांधवांचा विवाह हा भारतातला मूळ संस्कृती मूळ विचार बौद्ध पद्धतीने केला असेल परंतु तो व्यक्ती बौद्धाची जी पंचशील आहे त्या पंचशीलाच्या विरोधात कायम आचरण करत राहिला तरीदेखील त्याचं मेल्यानंतर बौद्ध पद्धतीने जलदान विधी होते. यामध्ये काय लक्षात येते जे पंचशील म्हटलं जाते त्याला धरून आचरण केलं तर परिवर्तन पुढे टिकते आणि क्रांती होते. पण पंचशिलाच्या विरोधात आयुष्यभर काम केलं आणि मेल्यानंतर बौद्ध पद्धतीने जलदान विधी होत असेल याच्यामध्ये संस्कृतीत जपली गेली वैदिक संस्कृती नाकारली गेली परंतु पंचशिलाच्या विरोधात वागला म्हणून ती संस्कृती परिवर्तन करू शकत नाही. ही परंपरा बनली. परिवर्तन करण्यासाठी संस्कृतीत ठरलेले आपल्या हितासाठी जे नियम आहेत ते आचरण करणे आणि त्यालाच धरून विधी करणे हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचा वारसा पुढे चालवण्याचा आहे.
म्हणून ज्यांचे विवाह सत्यशोधक पद्धतीने झालेले आहे परंतु आज ते जर वैदिक पद्धतीने सर्व विधी करत असतील आणि वैदिक व्यवस्थेला मजबूत करत असतील आणि असे सत्यशोधक कार्यकर्ते मेल्यानंतर जर त्यांचा सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया होत नसेल तर अशी संस्कृती आणि सत्यशोधक हा वारसा म्हणून क्रांती करेल असं होणार नाही तर ती परंपरा बनते. *आणि परंपरा चालवल्याने क्रांती होत नाही.*
म्हणून महाराष्ट्रभर आणि भारतात काम करणारे शिवराय ते भिमराय या विचाराचा प्रचार प्रसार करून समाजाला वैदिक गुलामीतून मुक्त करून या भारतात स्वातंत्र्य करू इच्छिणारे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी आजच आपल्या कुटुंबाला समाजाला सांगणे गरजेचे आहे की आपला कल्चर सत्यशोधक आहे म्हणून आपल्या कुटुंबामध्ये सर्वे विधी हे सत्यशोधक पद्धतीने होती आणि मी त्या विचाराचा कार्यकर्ता आहे म्हणून मी मेल्यानंतर माझी दशक्रिया सुद्धा ती सत्यशोधक पद्धतीने झाली पाहिजे हे सांगणे गरजेचे आहे. हे जर तुम्ही सांगत नसाल तर तुम्ही आयुष्यभर केलेले कार्य हे त्या क्षणाला शून्य होते. म्हणून एवढी जागृती करून सुद्धा का क्रांति होत नाही फक्त त्याचा एकच मूळ कारण हे संस्कृती अर्थात सभ्यता.
जसे वैदिक संस्कृतीने ,काशी तीर्थक्षेत्र भेटलेल्या भक्तांना सांगितले जाते किंवा कथातून प्रचार केला जातो की तू जेव्हा मरशील तेव्हा तुझी दशक्रिया नाही तर तेराव्या झाले पाहिजे हे त्या माणसाला सांगून ठेवलंय आणि तो माणूस त्या पद्धतीने आपल्या घरात आणि समाजात प्रचार प्रसार करतो जेव्हा तो व्यक्ती मरतो तेव्हा समशानभूमीमध्ये चर्चा होते त्या व्यक्तीने काशी केली त्याचा दशक्रिया नाही तर तेरावे होईल. शोक सभेमध्ये अलाउन्स केलं जाते की अमुक अमुक तारखेला यांचं तेरावे होणार आहे. लोक असे करतात म्हणून वैदिकांची संस्कृती जिवंत आहे.
म्हणून आम्हाला आमची कृषी संस्कृती जर जिवंत ठेवायची असेल आणि हे परिवर्तनाचा कार्य पुढे चालवायचा असेल आणि या परिवर्तनातून क्रांती झाली पाहिजे आणि ती क्रांती पुढेच टिकली पाहिजे यासाठी आपण आपला विधी मूळ संस्कृती कृषी संस्कृती सत्यशोधकाला धरूनच केला पाहिजे.
म्हणून आपण सर्व परिवर्तनवादी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चळवळी पण आदर्श विचार आणि दिशा फुले शाहू आंबेडकर शिवराय ते भीमराव यांना धरून जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी हा विचार आजपासूनच ठाम करून समाजाला आणि कुटुंबाला सांगितला पाहिजे आणि आपण असे सर्वजण करणार तरच क्रांती होईल अन्यथा गुलामी हजारो वर्षाची नक्की आहे. आपण सर्वजण याचा अनुसरण करणार अशी अपेक्षा करतो.
आता विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्या विचारांचा उलगडा करण्यासाठी अधिवेशन आवश्यक आहे म्हणून आपण विचाराचा वारसा जपण्यासाठी सर्वानुमते सर्व फुले शाहू आंबेडकर या विचाराने काम करणारे विविध नावाने ओळखला जाणाऱ्या सर्व चळवळी मिळून हरी नरके साहेब यांचा विचाराचा वारसाचा उलगडा करण्यासाठी नाशिक येथे अधिवेशन घेत आहोत.




