




🔸शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धेत लिटल ब्लॉजम स्कूलचा संघ विजयी
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
ता.धरणगाव(दि.17ऑगस्ट):– क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धो धरणगाव येथील ACS काॅलेज येथे दि.17 ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या या स्पर्धेत धरणगाव येथील लिटल ब्लाझम स्कूलच्या 14 व 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून त्यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या बद्दल विजयी संघांना ACS काॅलेज चे प्राचार्य श्री. वळवी सर प्रा.बोरसे सर तालुका क्रीडा समन्वयक श्री सचिन सूर्यवंशी सर ACS काॅलेज चे क्रीडा संचालक श्री. जितेंद्र ओस्तवाल सर यांनी शुभेच्छा दिल्या विजयी संघांना क्रीडा शिक्षक श्री.पवन बारी सरांचे मार्गदर्शन लाभले.

