Home महाराष्ट्र वरूड येथे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कौतुक सोहळा उत्साहात संपन्न. मथूराबाई...

वरूड येथे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कौतुक सोहळा उत्साहात संपन्न. मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम.

98

 

वरूड प्रतिनिधी.
वरूड येथे सर्व क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांनी शालेय जिवनात ज्ञानार्जन करीत प्रगतीच्या भावी शिखराकडे जातांना यशाचे अनेक उंबरठे नेत्रदिपक गुणवत्तेने पार करावे. या सोबतच शिस्त, सामाजिक, नितीमुल्ये, नैतीकता तथा आदर्शाचे वास्तव धडे घ्यावे त्यातूनच सकारात्मक दृष्टीकोनाने उन्नत जीवनाच्या मार्गाने प्रवास करीत असतांना आत्मबळ वाढविण्यासाठी शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कौतुक सोहळा’ नुकताच वरूड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात वरूड तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शेकडो गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नीलेश ठाकरे यांच्या पुढाकाराने वरूड तालुक्यातील शेकडो गुणवंत, कर्तबगार व सिध्दता असणाऱ्यांचा सन्मान, गौरव
भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आल्यामुळे शेकडो गुणवत विद्यार्थ्यांनी नीलेश ठाकरे यांचे आभार मानले.
वरूड येथील गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा हा सामाजिक आणि भावनीक ठरला आहे. १० वी व १२ वी व इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हा त्यांना भावी उज्ज्वल वाटचालीकरिता ध्येय निर्माण करणारा असून अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
गुणवंत विद्यार्थी ही राष्ट्राची मौल्यवान संपत्ती असल्याने त्यांनी घेणारे होण्यापेक्षा देणारे होवून समाजाला, देशाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करावा यासाठी वरुड तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी व उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहीत करणारा सत्कार सोहळा मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणा-या नागरिकांना गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित नागरिकांचा सहभाग नक्कीच उत्साह वाढणारा होता.
यावेळी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार “१४ ॲागस्ट १९४७ विभाजन विभिषिका दिवस” व “मेरी माटी मेरा देश” हे उपक्रम देखील साजरा करण्यात आले व हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे विदर्भ संघटन मंत्री डॅा. उपेंद्र कोठेकर, भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रविण पोटे पाटील, वरुड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वातीताई युवराजजी आंडे, शेघाट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रुपेश मांडवे, डॅा. रत्नाकर भेलकर, विदर्भ समाज कल्याण व बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष विकास ठाकरे, मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नीलेश ठाकरे, प्रकाशराव ठाकरे, नगरपरिषदेचे नगरसेवकांसह पत्रकार बांधव, शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद, परिसरातील गणमान्य नागरिक व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी शेकडो गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here