Home महाराष्ट्र चंद्रयान तीन ची प्रतिकृती साकारत वेदांत नॅशनल स्कूलच्या रॅलीने गंगाखेड शहरवासीयांना केले...

चंद्रयान तीन ची प्रतिकृती साकारत वेदांत नॅशनल स्कूलच्या रॅलीने गंगाखेड शहरवासीयांना केले आकर्षित

70

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16ऑगस्ट):-भारत देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी देशाच्या शास्त्रज्ञाने करून दाखवली आहे चंद्रयान तीन यशस्वीपणे पूर्ण करून जगामध्ये आपले नाव उंचावले आहे. त्याच चंद्रयान तीनची प्रतिकृती करुन वेदांत नॅशनल स्कूल महातपुरी व वेदांत बालक मंदिर गंगाखेड यांच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त शहराच्या मुख्य ठिकाणाहून चंद्रयान हा देखावा साकार करण्यात आला होता.

शहराच्या शिवाजी महाराज चौक, श्रीराम चौक,अहिल्याबाई होळकर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य ठिकाणाहून पोलीस स्टेशन गंगाखेड या ठिकाणी संस्कृती इंगळे, शिवानी सूर्यवंशी, सुमित जोगदंड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक भोसले सर, संस्थेच्या सचिव सुप्रिया भोसले मॅडम शिक्षकांचे मार्गदर्शक आकाश भोसले सर व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here