Home महाराष्ट्र ग्रामपंचायतचे सरपंच तसेच इतर सदस्यांचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कांग्रेस...

ग्रामपंचायतचे सरपंच तसेच इतर सदस्यांचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कांग्रेस पक्षात प्रवेश

152

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि. 16 ऑगस्ट):-तालुक्यातील अर्हेर-नवरगाव येथील ग्रामपंचायत सरपंच तसेच इतर सदस्यांचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सरपंच तसेच इतर सदस्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. ग्रामपंचायत अर्हेर-नवरगाव येथील सरपंचा दामिनी जागेश्वर चौधरी तसेच सदस्य प्रवीण मारोती दाणी, सदस्य यशुका संतोष कूथे, सदस्य सुनीता दिगांबर मडावी यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यावर विश्वास ठेवून कांग्रेस पक्ष्यात प्रवेश केला.

13 ऑगस्ट 2023 रोजी ब्रह्मपुरी शहरात विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता यावेळी मा. वडेट्टीवार यांनी लोकांना जागृतीचा मंत्र दिला होता.तुम्हाला देश वाचवायचा असेल तर 2024 च्या निवडणुकीत केवळ काँग्रेस पक्ष सत्येत आणणे हाच मोठा योग्य पर्याय आहे. असे मौलीक विचार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मौलीक विचार सत्यात उतरण्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील अर्हेर-नवरगाव येथील ग्रामपंचायत सरपंच तसेच इतर सदस्यांनी कांग्रेस पक्ष्यात प्रवेश केला.

————————————–
प्रतिक्रिया:- भविष्यातील विकासाच्या दृष्टीने कांग्रेस पक्षच लोकांच्या हिताचे राहील त्यामुळे कांग्रेस पक्षात प्रवेश घेणे सोयीस्कर वाटले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेहमीच काम जनतेच्या हिताचे असल्याने साहजिकच वडेट्टीवार साहेबांच्या मार्गदर्शनात काम करायला आवडेल. —
दामिनी जागेश्वर चौधरी( सरपंच ग्रा.प. अर्हेर-नवरगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here