कुरखेडा: – स्वातंत्र्य दिनानिमित्त नवसंजीवनी सार्वजनीक वाचनालय देऊळगाव येथे सुप्रसिध्द कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगीता संतोष ठलाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी जि.प.शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, विद्या विकास हायस्कूल येतील शिक्षक विद्यार्थी, तसेच अनेक क्षेत्रातील कर्मचारी, सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ठपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले त्यावेळी प्रतिष्ठीत नागरिक अमृत ठलाल, माजी पोलीस पाटील विठ्ठल गहाणे, देऊळगाव येतील पोलीस पाटील नास्तिक पंधरे, अशोक मडावी, श्रावण ठलाल, शिक्षक मोहन देशमुख, शिक्षक बावणे, कोसरे,उईके अंगणवाडी सेविका तारा खुणे यशवंत ठलाल तसेच देऊळगाव येतील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
