Home गडचिरोली हरडे वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिकांक प्रकाशित

हरडे वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिकांक प्रकाशित

34

 

चामोर्शी : केवळरामजी हरडे महाविद्यालय, बीकॉम कॉलेजचा वर्ष 2022-23 चा वार्षिकांक, ब्रम्हांड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रकाशित करण्यात आला.
या वार्षिकांकात बीकॉम प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी आपले लेख कविता व सामान्य ज्ञान अशा विविध सदरांमध्ये आपली लेखन साहित्य कला जपलेली आहे.तसेच या वार्षिकांकात महाविद्यालया द्वारे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना अहवाल रुपात देण्यात आलेला आहे.
या वार्षिक अंकाचे संपादन प्रा डॉ महेश जोशी तसेच संपादक मंडळातील सदस्य प्रा डॉ पवन नाईक प्रा गणेश दांडेकर प्रा महादेव सदावर्ते यांनी केले असून वार्षिकांकाची मुखपृष्ठ संकल्पना बीकॉम तृतीय वर्षात शिकणारा विद्यार्थी सचिन रोहनकर याची आहे .
या वार्षिकांकास यशोदीप संस्था गडचिरोली चे अध्यक्ष अरुण हरडे आणि सचिव सौ स्नेहा हरडे यांनी शुभेच्छा दिल्या असून संपूर्ण कार्यकरी मंडळातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला .
या प्रकाशन सोहळ्याला प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here