Home अमरावती स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रेल्वे स्टेशन बडनेरा येथे साफसफाई

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रेल्वे स्टेशन बडनेरा येथे साफसफाई

119

 

बडनेरा – भारत सरकारच्या “अमृत भारत योजने चे औचित्य साधून प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना ने दिनांक ०६ ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन बडनेरा येथे स्वच्छ भारत अभियान राबविले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांद्वारे बडनेरा येथील रेल्वे स्थानक परिसरात प्लास्टिक निर्मूलन उपक्रमा अंतर्गत रेल्वे स्थानक दर्शनीय परिसरातील कचरा प्लास्टिक बॉटल्स जमा केला व जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क करून लावावी हि विनंती करण्यात आली. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी परिसरात ठीक ठिकाणी भेट देऊन स्वच्छेतेविषयी माहिती दिली. तसेच अमृत भारत योजनेच्या कार्यकर्मासाठी उपस्थित जनसमुदायाला विद्यार्थ्यांनी स्वच्छेतेबाबत जनजागृती केली. कार्यक्रमाला उपस्थित अमरावती च्या लोकप्रिय खासदार नवनीत राणा व बडनेरा चे माननिय आमदार रवीभाऊ राणा ह्यांनी विध्यार्थ्यानी केलेल्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेत, विद्याथ्यांशी हितगुज साधून त्यांचे मनोबल व उत्साह वाढवला. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी वीरेंद्र वडनेरे, रेल्वेचे एडीआर एम. सुनील कुमार सुमन , डी. के. शुक्ला,तसेच इतर रेल्वे अधिकारी संजय इंगळे, डी. बी. मेश्राम, संदीप वानखडे, अर्चना सागोळे ( कुर्हे), ममता कोसे, ह्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केलं व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम कदम, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय खंडार, प्रा.किशोर ढाके,व रासेयो स्वयंसेवक सुरज मुंढे ,अनघा सराफ ,अमन खंडारे,तेजस भोरे ,प्रथमेश सवाई ,तनुजा खोब्रागडे अनुराधा भोरे व समस्त विद्यार्थ्यांनी केले . महावियालयाच्या १५० विध्यार्थ्यानी ह्या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदविला . कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, मा. उपाध्यक्ष अॉडव्होकेट उदयजी देशमुख, मा. कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, मा. सचिव श्री. युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य मा. श्री. शंकरराव काळे, मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. सौ. रागिनीताई देशमुख, मा. डॉ. सौ. वैशालीताई धांडे व मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here