Home लाइफस्टाइल चोपडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस साजरा

चोपडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस साजरा

68

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.7ऑगस्ट):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील वाणिज्य विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवसानिमित्ताने ‘सी. ए. आपल्या भेटीला’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सनदी लेखापाल प्रियंका मनीष टाटीया तर प्रमुख पाहुणे म्हणून सनदी लेखापाल धनश्री सतिश गुजराथी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के एन सोनवणे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी.पाटील, पर्यवेक्षक ए. एन.बोरसे,समन्वयक पी.एस. पाडवी व दिपक करंकाळ आदि मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटक प्रियंका टाटीया म्हणाल्या की, ‘इच्छाशक्ती असेल तर मार्ग दिसेल’. यावेळी त्यांनी विद्यार्थांना CA कोर्स बद्दल मार्गदर्शन केले. धनश्री गुजराथी मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, ‘विदयार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून सीए होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी’.अध्यक्षीय भाषणाप्रसंगी उपप्राचार्य एन. एस.कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांना शंका विचारून यशाचा मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवृत्ती पाटील यांनी केले तर आभार विवेकानंद शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस.टी.शिंदे, संदिप पाटील, सौरव जैन,विशाल बोरसे, साक्षी गुजराथी, निकीता शर्मा व धिरज बावीस्कर यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here