Home महाराष्ट्र सव्वा कोटी दंड कमी करण्यासाठीपंधरा लाखाची लाच भोवली

सव्वा कोटी दंड कमी करण्यासाठीपंधरा लाखाची लाच भोवली

123

🔸नाशिक तहसिलदार बहिरमला एसीबीने केली घरातच अटक

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शाताराम दुनबळे)

नाशिक(दि.7ऑगस्ट):-नाशिक शहराजवळील राजुर बहुला येथे मुरुम ऊत्खननाबाबत मुल्यनियमानुशार पाचपट दंडव स्वामित्व धन जागा भाडे मिळुन एक कोटी २५ लाख रुपये दड कमी करण्यासाठी १५ लाखाची लाच घेताना नाशिक तहसिलदार नरेशकुमार बहीरम वय ४४ रा ं मेरीडीयन गोल्ड कर्मयोगीनगर नाशिक येथे घरातच लाच लुचपत प्रतिबधक पथकान रंगेहातआज अटक केली असुन अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहीती अशी की,राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत आलोसे यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते.

त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते.

परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते आरोपी लोकसेवक यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज दिनांक ०५/०८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून तहसिलदार बहीरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरीष्ठ अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावकर ,अप्पर अधिक्षक माधव रेड्डी,व उपअधिक्षक नरेन्द्र पवार याच्यां मार्गदर्शनाखाली
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
स्वप्नील राजपूत,पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पो. ना. गणेश निबाळकर, पो. ना. प्रकाश महाजन,पो. शि. नितीन नेटारे.आदीनी सापळा यशस्वी केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here