सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
पुसद (दि. 6 ऑगस्ट) गुलाम नबी आझाद ऊर्दू हायस्कूल मध्ये इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ आपल्या घरातील टाकाऊ वस्तू मधुन शैक्षणिक वस्तू जसे पेन बॉक्स,पेन्सिल बॉक्स, कम्पोस बॉक्स, अश्या अनेक सुंदर वस्तू कोणत्याच प्रकारच्या खर्चाविना आपल्या स्वतः बनून प्रदर्शित करण्यात आल्या या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना आठवीचे वर्गशिक्षक सय्यद सलमान सरांच्या विशेष प्रयत्नांनी या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक मो.सादिक सरांनी निरीक्षक करून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तू बद्दल प्रोत्साहित केले आणि अभिनंदन व्यक्त केले व या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे हाजी अख्तर खान शाळेचे जिया सर ,सलिम सरांनी प्रदर्शन बघून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले या प्रसंगी फरहा दीबा मॅडम, तारीक अहे खान सर ,सय्यद नवेद सर,मो.नवेद सर ,साकीब सर, जवेरिया मॅडम तसेच माध्यमिक सहकारी शिक्षक उपस्थित होते.
अश्या प्रकारच्या उपक्रमद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होतो व त्यांच्यामधील असलेल्या सुप्तगुणाना चालना मिळावी म्हणून सय्यद सलमान सर व सरकारी शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात तसेच अश्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम नेहमी राबवित असतात.
