Home महाराष्ट्र अमृत भारत स्टेशन योजना परिवर्तनाची नांदी ठरेल – आ.डॉ.गुट्टे

अमृत भारत स्टेशन योजना परिवर्तनाची नांदी ठरेल – आ.डॉ.गुट्टे

53

🔸गंगाखेड स्टेशन ‘हायटेक’ होणार : तब्बल २४ कोटी निधी मंजूर

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6ऑगस्ट):-रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्य लोकांना परवडणारा असतो. त्यामुळे देशातील कोट्यावधी जनता रेल्वेवर अवलंबून असते. वाढती लोकसंख्या हे सर्व क्षेत्रात आव्हान ठरते आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवासी असलेल्या कोणत्याही माणसाला पायाभूत सुविधांसह सुरक्षित प्रवास मिळाला पाहिजे. म्हणून केंद्र सरकारने रेल्वे स्थानकाचा विकासासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू केली आहे. त्यामध्ये प्रत्येक वर्षी काही स्टेशन निवडून त्यांचा चौफेर विकास केला जाणार आहे. त्यामुळे हि योजना परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.

अमृत भारत योजनेतंर्गत गंगाखेड रेल्वे येथे आयोजित पुर्नविकास पायाभरणी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील तब्बल ५०८ स्थानकांच्या पायाभरणी कामांचा ऑनलाईन शुभारंभ संपन्न झाला. शेवटी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित केले.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, प्राप्त निधीतून रेल्वे स्थानकाचा पायाभूत विकास कार्यक्रम राबविण्यात येईल. साहजिकच यामुळे गंगाखेड रेल्वे स्थानकाचे रूप बदलणार आहे. या योजनेत देशातील १,३०९ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. त्यासाठी २५ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून दीर्घकालीन दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकाचा पायाभूत विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी दररोज स्थानकावर येणारी सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीतच प्रवासी केंद्रित सुविधा स्थानकावर विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. नको असलेली बांधकामे हटवून पदपथ विकसित करणे, रस्त्यांचे रुंदीकरण, वाहनतळाची आधुनिक व्यवस्था, ग्रीन पॅचद्वारे प्रवाशांना सुखद अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व नागरिकांना रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षागृहात बसता येईल अशी व्यवस्था देखील करण्यात येईल.

कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध शाळा आणि नृत्य ॲकडमी मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर उत्तम नृत्याचे सादरीकरण केले. ते पाहून उपस्थित भारावून गेले. त्यानंतर चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व आर्कषक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, रेल्वे स्थानकाचा विकास झाल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही. तसेच प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित होईल. यामुळे प्रवाशी समाधानी झाले आहेत.यावेळी वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी रवि कुमार, सुधाकर मलदोडे, वाणिज्य निरीक्षक प्रकाश हरून, वरिष्ठ अधिकारी शंकर तांदळे, सुबोध कुमार,स्टेशन प्रबंधक राहूल डोंबे,
वरिष्ठ लिपीक शिवाजी दौंड, प्रफुल्ल मेश्राम, माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप आळनूरे, भाजप चे लोकसभा समन्वयक डॉ.सुभाष कदम, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, राजू खान, जेष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार, लहू घरजाळे, ऍड.मिलिंद क्षीरसागर, मंगेश मुंडे, माणिक नागरगोजे, प्रशांत काळे, सुनिल साहू, कुमार विप्लव, संजय घाटे, महादेव भुरे, सचिन पटेकर, जावेद शेख, संतोष घुगे, प्रभाकर इंगोले, दाऊद पठाण, मोतीराम काळे, मुकूंद पराळे, नितीन गवळी, प्रभाकर साळवे, गया पासवान, शेख इम्रान शेख, निसार शेख, विजय साळवे यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*मागण्या विचारात घ्या गंगाखेड येथे सर्व गाड्यांना थांबा द्या. गंगाखेड मधील पडेगाव आणि चारठाणा तर पूर्णाचे फुकटगाव येथील प्रलंबित अंडर ग्राउंड पूलाचे काम तातडीने पूर्ण करा. लोकांना चांगल्या पायाभूत सुविधा द्या, अशा लोकोपयोगी मागण्या सुध्दा आ.डॉ.गुट्टे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.

*स्पर्धेचा असा आहे ‘निकाल’*
चित्रकलेत श्रृती वरद, आकांक्षा गायवळ, अक्षदा शिंदे, आकांक्षा शिंदे, श्रध्दा आष्टीकर, पूजा भिसे वक्तृत्व मध्ये कृणाल बेंद्रे, निकीता घरजाळे, सायली विडकर, वैष्णवी जाधव, नंम्रता घनघाव, आयेशा शेख तर निबंधात ऋतुजा फड, अभिषेक लवटे, निखिल शेफ, शशिकांत आंधळे, सोमनाथ कराड, सांची घरजाळे असे विजेतेआहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here