सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
महागाव(दि. 6 ऑगस्ट):- राज्यासह देशातील तमाम शोषित वंचित पिडीताना न्याय मिळावा व सत्तेपासून वंचित असलेल्या वंचितांना सत्तेचा वाटा मिळावा.
यासाठी अहोरात्र काम करीत असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार श्रद्धेय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच वंचित बहुजन आघाडीचा वाढता प्रभाव पाहून महागाव येथील माजी सरपंच तथा आरपीआय गवई गटाचे तालुका अध्यक्ष शेषराव राजनकर यांच्यासह सिद्धार्थ पेटारे, बळीराम मुनेश्वर ,गोवर्धन नरवाडे ,यांनी आपल्या निवडक समर्थकांसह शासकीय विश्रामगृह महागाव येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष प्रल्हाद नवसागरे यांच्या नेतृत्वात जिल्हा महासचिव डी.के. दामोधर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, तालुका महासचिव गणेश पाईकराव, तालुका महासचिव पंजाब सरदार, ता.उप आद्यक्ष शेख चांद शेख अहमद, राजू हनवते, अविनाश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यावेळी शेषराव राजनकर यांच्यासह इतरांचेही हार व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
