(विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्ष लागवड)
सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.:-9823995466
उमरखेड : – (दि. 6 ऑगस्ट) महाविद्यालयाचे संस्थापक आणि शिक्षणप्रेमी कै. नारायणराव पाटील वानखेडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 09.00 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. राम अनंतराव देवसरकर साहेब व संस्थेचे सचिव आदरणीय डॉ. यादवरावजी राऊत, महाविद्यालय विकास समिती व सल्लागार समिती चे अध्यक्ष व सदस्य
त्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. माधवराव कदम व सर्व प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक कार्यक्रमास
तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून राबविण्यात आला होता.
व त्यानिमित्त विविध प्रकारच्या विविध प्रजातीच्या वृक्षांची जसे बकुळ, वड, पिंपळ, आवळा, कडुलिंब इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेतील व एनसीसी चे बरेच विद्यार्थी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्ष लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाची आखणी व रूपरेषा कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना प्रा. डॉ. प्रशांत अनासने व प्राध्यापिका ए.पी. मिटके मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक एस. एस. इंगळे सर यांच्यामार्फत करण्यात आली व सोबतच महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग होता.
वृक्षारोपण कार्यक्रमात प्रा. डॉ. के. एस. सोनटक्के प्रा. एस. एस. पाचकुडके, श्री. रामेश्वर बावस्कर, श्री. दीपकभाऊ पातुरकर, श्री. लक्ष्मण, श्री.दोडके यांचे विशेष सहकार्य लाभले.
