सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंच राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने मसवड शहरात मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी . देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी मसवड शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी मनोहर कुलकर्णी यांच्या विरोधात सिद्धनाथ मंदिर ते महात्मा फुले चौक मार्ग मोर्चा काढण्यात आला आहे यामध्ये शहरात विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात निलेश काटे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सचिव. प्रा विशंवभर बाबर प्रा कविता म्हेत्रे शहाजी लोखंडे राजू भोसले किशोर सोनवणे विकास गोंजारी जय राजमाने रणजीत येवगे दाऊद मुल्ला राजकुमार डोंबे परेश विलास रुपनवर बाळासाहेब आटपाडकर अनिल लोखंडे अजित केवटे.
महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण व बहुजन शिक्षणाचे कार्य अठराव्या शतकामध्ये ताकतीने आणि जमाने केले म्हणूनच बहुजन स्त्रिया आपल्या पायावरती उभा आहेत आज सुधारणेला खोडा घालण्यासाठी संभाजी भिडे यासारखी नथ दृष्ट समाजकंटक प्रयत्न करत आहेत संभाजी भिडे यांचे वर देश द्रोह खटला दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली मसवड ममंडल अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
