Home बीड गेवराई : चकलांबा पोलिसांनी जप्त केलेला पाच लाखाचा मुद्देमाल पीडित शेतकऱ्याला केले...

गेवराई : चकलांबा पोलिसांनी जप्त केलेला पाच लाखाचा मुद्देमाल पीडित शेतकऱ्याला केले परत

126

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

गेवराई तालुक्यातील तांदळा येथील शेतकरी दादाराव हकाळे यांनी 75 क्विंटल कापूस विक्रीसाठी आयशरमध्ये भरला होता परंतु अज्ञान चोरट्याने रात्रीतून वाहनांसह चोरून नेला होता. ही घटना गेवराई तालुक्यातील तांदळा येथे दि.7 एप्रिल रोजी रात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती. मयूर किराणा दुकानासमोर कापसाने भरलेल्या आयशर टेम्पो अज्ञान चोरट्यांनी पळवला होता. याबाबत टेम्पो मालकांनी चकलांबा पोलिसात अज्ञान चोरट्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्र जलगतीने फिरवले व दोन महिन्यात या गुन्ह्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पाचोरा जिल्हा जळगाव येथील एका जिनिंग मालकास हा कापूस विकला असल्याची कबुली चोरट्यांनी दिली व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून त्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यांच्या कापसाचे पाच लाख रुपये मिळवून दिले. वर्षभराची कष्टाची कमाई परत मिळाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू दिसले. नारायण एकशिंगे व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here