Home महाराष्ट्र आशा सेविकांचा थकित मानधन त्वरित जमा करा..!

आशा सेविकांचा थकित मानधन त्वरित जमा करा..!

121

🔹आशा व गटप्रवर्तक संघटनांचा काम बंद आंदोलन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 2 ऑगस्ट):-तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक व आशासेविकांनी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालया समोर दि 1 ऑगस्ट रोजी आपला थकित मानधन त्वरित मिळावा त्यासोबत विविध मागण्या सह कामबंद आंदोलन केले आहे.2020 ते 21 कोरोना कालावधीमध्ये फेब्रुवारी, मार्च या महिन्यात प्रत्येकी आशांचे एक हजार रुपये प्रमाणे थकीत असलेले पैसे व प्रतिवर्षी बारा हजार रुपये मानधन दिल्या जातो परंतु यावर्षी पाच ते सहा हजार च्या दरम्यान मिळाल्याने आशा सेविकांनी व गटप्रवर्तकांनी या विषयी वरिष्ठांना विचारपूस केली असता डाटा एन्ट्री नुसारच मानधन करण्यात आले असे उडवा उडवी चे उत्तर दिले जातात.

ANM, MPW, CHO यांना पूर्ण मोबदला देण्यात येतो परंतु आशा सेविकांचे मानधन कापण्यात येतो.मागील तीन वर्षापासून मुख्यालयात राहणाऱ्या अशांना मानधन देण्यात आले नाही त्यासोबत दरवर्षीप्रमाणे 600 रुपये सादिल खर्च मिळत असतो परंतु 2022 मार्च पासून दिले गेले नाही मागील तीन वर्षाचे रक्कम शिल्लक शासनाकडे असल्याने आशा सेविकांनी रोष व्यक्त केला आहे .

2023 जानेवारी ,फेब्रुवारी ,मार्च या तीन महिन्याचे साडेतीन हजार रुपये प्रमाणे पैसे येऊन सुद्धा वरिष्ठांनी पैसे दिले गेले नाही.बीसीएम व अकाउंटंट यांनी आशा सेविकांचे शिल्लक चुका काढून पैसे कपात करीत असल्याचेही आरोप करण्यात आले.केंद्र शासनाच्या मानधनातून पैसे कपात होत असेल तरच राज्य शासनाच्या मानधनातून पैसे कपात करता येतो असा जी.आर असतानाही नियमाच्या बाहेर जाऊन वाढीव निधीमधून पैसे कपात केल्या जाते.

त्याचप्रमाणे गटप्रवर्तकीचे 4700 प्रमाणे तीन महिन्याचे पैसे थकीत असल्याचे सांगण्यात आले.गटप्रवर्तकांना वाढीव पैसा आले असतानाही अद्यापही देण्यात आले नाहीत.संपूर्ण जिल्ह्यामध्ये आशा सेविकांना व गटप्रवर्तकांना नियमित मानधन दिला जातो परंतु उमरखेड तालुक्यात असा भोंगळ कारभार सुरू असल्याचे येथील आशा सेविकांनी व गटप्रवर्तकांनी खंत व्यक्त केली.या सर्व मागणीसह तालुक्यातील दोनशे ते अडीचशे अशा सेविका व गटप्रवर्तकांनी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालया समोर जोपर्यंत अशा सेविकांच्या खात्यात पैसा येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

आपल्या संसाराचा गाडा चालवत आशासेविका व गटप्रवर्तीका प्रत्येक गावामध्ये सेवा देत असतात परंतु या शासनाच्या आडमुटी धोरणामुळे चार -चार महिने मानधन दिले जात नसून तालुक्यातील सर्व आशा सेविकांनी संताप व्यक्त करत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

चौकट :- बँकेत तांत्रिकदृष्ट्या अडचणी असल्यामुळे चेक उपलब्ध न झाल्यामुळे आशा सेविकांचे व गटप्रवर्तिकांचे मानधन देण्यात विलंब झाले आहे.

तसेच यांच्या मागणीचा विचार करून मानधन संदर्भात योग्य ती चौकशी करून वेळेत मानधन अदा करण्यात येईल येत्या आठ दिवसात सर्वांना मानधन देण्यात येईल. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धम्मपाल मुनेश्वर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here