Home बीड बीडमध्ये महिलेचा विनयभंग; हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांनी दिला चोप

बीडमध्ये महिलेचा विनयभंग; हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांनी दिला चोप

163

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

किल्ले धारूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराने दारूच्या नशेत आसोला (ता. धारूर) येथे एका महिलेचा घरी जाऊन तिचा विनयभंग केला. ग्रामस्थांनी त्याला चोप दिला. धारूर पोलिस ठाण्यात संशयित हवालदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्याला निलंबित केले. संजय गुंड असे या हवालदाराचे नाव आहे. हवालदार संजय गुंड याने सोमवारी (ता. ३१) रात्री उशिरा हे कृत्य केले. ग्रामस्थांनी चोप देऊन त्याला धारूर पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित महिलेचे नातेवाईक आज सकाळी हवालदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात आले, परंतु धारूर पोलिसांनी प्रकरण मिटवून घेण्यासाठी प्रयत्न केले.नातेवाईक ठाम राहिल्याने आणि पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाई झाली. गुन्हा नोंद झाल्यानंतर ठाकूर यांनी गुंड याला निलंबित केले. दरम्यान, आक्रमक भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांसोबत धारूर पोलिस ठाण्यातील काहींनी अरेरावीचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here