रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.2ऑगस्ट):-नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रम्हपुरी येथे आज दि.1ऑगस्ट 2023 मंगळवार ला आम्ही करू संचालने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका बनपुरकर, उपमुख्याध्यापक भैय्या , दलाल मॅडम , हटवार सर सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.
मयुरी गायकवाड हिने अण्णा भाऊसाठे यांचा जीवनपट उत्तम वकृत्वशैलीत सांगीतला.गरूडाला पंख ,वाघाला नखं,मुंबई शिवाय महाराष्ट्र ही सल संयुक्त महाराष्ट्र ची व्यथा माझी मैना गावाकडे राहीली ,माझ्या जीवाची होतीया काहीली या पोवाड्यातून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
लोकमान्य टिळकांचे बालपण ,कुशाग्र बुद्धीमत्ता, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान,इत्यादी बाबी भाषणातून व्यक्त करण्यात आले.बालपणातील संस्कार व शिस्त व्यक्तिमत्व घडवित असते याबाबत मार्गदर्शन सन्माननीय मुख्याध्यापिका बनपुरकर यांनी केले. संचालन व आभार विद्यार्थ्यांनींनी केले .
