Home महाराष्ट्र ‘ भीमस्मृति यात्रा ‘ एक उर्जा स्त्रोत : जयसिंग वाघ

‘ भीमस्मृति यात्रा ‘ एक उर्जा स्त्रोत : जयसिंग वाघ

43

✒️धुळे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

धुळे(दि.1ऑगस्ट):- धुळे येथील लांडोर बंगला येथे १९९१ पासून दरवर्षी ३१ जुलै रोजी ‘ भीमस्मृति यात्रा ‘ संपन्न होत आहे , या निमित्त राज्यभरातून हजारो लोक इथ एकत्र येतात , वेगवेगळे प्रबोधनपर कार्यक्रम घेतात , मोठ्याप्रमाणात पुस्तकांचे दुकाने लागतात , विविध गावांमधून वाजत गाजत मिरवणूका येतात , माहेरवाशिण महिला आपल्या माहेरी येतात या व इतर घटनांनी ही यात्रा आंबेडकरी चळवळीतिल कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा , नवी दिशा देते म्हणूनच धुळे येथील भीमस्मृति यात्रा एक ऊर्जास्रोत आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .

धुळे येथील लांडोर बंगल्यावर भीमस्मृति यात्रे निमित्त आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात वाघ बोलत होते .जयसिंग वाघ यांनी आपल्या विस्तृत भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटी विषई तसेच लांडोर बंगल्यावरील मुक्कामा विषई , पोळ्या च्या सणा निमित्त झालेला वाद , त्या वादा विषई बाबासाहेबांनी न्यायालयात मांडलेली बाजू , जनतेला जाहीर सभेतुन केलेले मार्गदर्शन , जनतेने केलेले स्वागत , बाबासाहेबांनी धुळे शहरातील विविध ठिकाणी दिलेल्या भेटी , बस स्टैंड मागील रेस्ट हाउस मधील निवास या बाबतही माहिती दिली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सैंदाणे यांनी केले , प्रास्ताविक डॉ. उल्हास तासखेडकर यांनी तर आभार प्रदर्शन नथु अहिरे यांनी केले , विशाल सालुंखे यांनी परिचय करुन दिला . संयोजक दिलीप तासखेडकर यांनी आपली भूमिका विशद केली .सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमास मोठ्या संखेने लोक हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here