Home महाराष्ट्र उमरखेड येथे ATM कार्ड ची अदलाबदल करणाऱ्या चोराला अटक

उमरखेड येथे ATM कार्ड ची अदलाबदल करणाऱ्या चोराला अटक

94

🔸आरोपीकडे 21 प्रकारचे एटीएम कार्ड मिळाले

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 31जुलै):- उमरखेड येथे एटीएम कार्ड अदलाबदली करणाऱ्या चोराला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त पोलीस स्टेशन येथे दिनांक 30 जुलै 2023 रोजी नामे कृष्ण दिगंबर वासमवार वय 61 वर्षे राहणार सदानंद वार्ड उमरखेड यांनी फिर्याद दिली असता फिर्यादी हा पुसद रोड उमरखेड येथील पुसद अर्बन बँकेचे ATM मशीनवर ATM कार्डद्वारे पैसे काढण्याकरिता गेला असता आरोपी नामे सागर बबन थोरात वय 28 वर्ष राहणार बदलापूर (पूर्व) ठाणे हा त्याच्या मागे उभा राहून तिळाचे लक्ष विचलित करून त्याचे एटीएम कार्ड फिर्यादीस आरोपीने त्याच्या जवळील दुसरे एटीएम कार्ड दिले.

यावरून फिर्यादी यांनी सदर एटीएम कार्ड जुने असल्याचे लक्षात आल्याने ते म्हणाले हे एटीएम कार्ड माझे नाही माझे एटीएम कुठे आहे..!

अशी विचारणा केली असता आरोपी याने त्याच्या जवळील दोन्ही एटीएम फिर्यादीच्या अंगावर फेकून पळून जात असताना तेथे उपस्थित असलेले सुरक्षारक्षक यांनी त्यास पकडले.

व पोलिसांच्या ताब्यात दिले व नमूद आरोपी हा एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने फिर्यादीने पोलीस स्टेशन येथे हजर होऊन रिपोर्ट दिल्याने पो.स्टे ला अप क्र. 477/2023 कलम 420,511 भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासावर आहे.

सदर गुन्ह्यामध्ये माहिती मिळतात पोलीस स्टॉप घटनास्थळी रवाना होऊन नमूद आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याची पंचासक्षम अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात वेगवेगळ्या बँकेचे एकूण 21 एटीएम कार्ड मिळून आले.

त्या सदर एटीएम कार्ड बाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने त्याच दि. 30 जुलै 2023 रोजी 11:30 ला अटक करण्यात आली असून दिनांक 31 जुलै 2023 रोजी आरोपी यास न्यायालय उमरखेड येथे हजर केले असता न्यायालयाने 1 ऑगस्ट 2023 पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला.

तसेच सदर गुन्ह्याचे तपासात एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक केल्याची इतर पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद असल्यास सदर गुन्ह्यांमध्ये तपास कामी नमूद आरोपीची आवश्यकता असल्यास वि न्यायालयातून ताब्यात घेण्याबाबत सर्व ठाणेदार यवतमाळ जिल्हा यांना बिनतारी संदेश द्वारे करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, पो.उप.नि. किशोर घोडेस्वार, पो.को. सुदर्शन जाधव हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here