सातारा-खटाव, प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
सातारा(दि.30जुलै):-महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी व दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्यामुळे वित्तहानी व जीवित हानी झालेली आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापनाने काटेकोरपणाने संकट टाळावे. वासाठी काही संकेत व उपायोजना तज्ञ मंडळींच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवलेला आहे. आहे. सातारचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डूडीसाहेब यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेमध्ये दरडी कोसळणाऱ्याच्या अनुषंगाने पूर्वसंकेत ओळखणे व खबरदारीचे उपायोजना सांगितली
या पार्श्वभूमीवर भूजलाचे निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे विहिरी, विंधन विहिरी जर तीन तासांहून अधिक काळ वाहत असेल. जर अचानक नवीन झऱ्याचे भासत असेल. उगम आढळला व त्याच्या प्रवाहामध्ये पाचपट अथवा अधिक वाढ झालेली असेल. शन्याच्या पाण्याचे तापमान नैसर्गिक तापमानापेक्षा साधारण पाच अंश सेल्सियस पेक्षा अधिक अतिवृष्टीमुळे झाड, विद्युतपोल, कुंपण तिरके होणे, ही लक्षणे दिसू लागणे, पक्षी व जनावरांच्या वागण्यात अचानक बदल होणे. त्यामध्ये वेगळा आवाज काढणे किंकळणे पायाने जमीन उकरणे. पक्षी एकत्र देणे.
घरातून जमिनीतून पाण्याचे पाझर फुटणे अथवा झरे निर्माण होणे व घरातील जमिनीची फरशी उचकटणे. जमिनीला नवीन ठिकाणी पाजर फुटणे. नियमित येणाऱ्या ज्ञन्यातून अचानक गढूळ पाणी येवू लागणे, भात खचरांना भेगा पडणे अशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी अशा ठिकाणापासून किमान पाचशे मीटर दूर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे. अपेक्षित आहे. तसेच ही बाब शासकीय सेवेत असणाऱ्या सर्व यंत्रणेला कळवणे हे काम केले पाहिजे. सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील दळण भागातील एकूण ४८९ कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.




