




✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.30जुलै):- साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे या एका महान साहित्यिकाने ब्राह्मणी व्यवस्थेला कंटाळून अवघ्या दीड दिवसाच्या शाळेच्या ज्ञानाच्या जोरावर आपले साहित्य जागतिक पटलावर नेऊन ठेवल अशा महापुरुषाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली वाटेगावातील मांगवाड्यात झाला.ब्रिटिश काळात ब्रिटिश लोक भांडवलदारांना लुटत होते पण ब्राह्मण व्यवस्थेनुसार मांग जातीत जन्माला आलेला फकीरा रानोजी मांग ब्रिटिशांना लुटत होता.ते लुटून आणलेलं धन अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी भविष्याला खतपाणी घालण्यासाठी देत होते.
अण्णाभाऊंचे क्रांतिकारी विचार फकीरा मांगाला जन्मता समजतात पण आमच्या मनुवादी प्रवृत्तीच्या व्यवस्थेला अजून समजलेले नाहीत हे या देशाचे दुर्दैव आहे. म्हणून फकीराने केलेल्या उपकाराची जाणीव आणि फकीराने लढवलेल्या क्रांतीची ठिणगी ही अण्णाभाऊंनी फकीरा या कादंबरीत साकारले ही कादंबरी अण्णाभाऊंनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली.
मुख्यता या देशाचे प्रतिनिधित्व करत असलेले या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांना आदित्य संतोष लोखंडे यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा या मागणीचे पत्र ईमेल द्वारे पाठवले होते परंतु यांनी याकडे दुर्लक्ष केले म्हणून आमच्या व्यथा कोणापुढे मांडायच्या ? हा प्रश्न आमच्यामध्ये निर्माण झाला आहे.
आतापर्यंत भारताच्या इतिहासात ज्यांनी ज्यांनी भारताचे नाव जागतिक पातळीवर झळकवलं अशा महान व्यक्तींना भारताचा सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार दिला जातोय. उदा., देशाची गान कोकिळा ज्यांना म्हटलं जातं त्या लतादीदी मंगेशकर,ज्यांना क्रिकेटचा देव म्हणलं जातं ते सचिन तेंडुलकर यांसारख्या विविध प्रकारचे व्यक्तींनी विविध क्षेत्रांमध्ये भारताला सर्वोच्च सन्मान मिळवून दिला आहे त्याच प्रकारे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास पाहिल्यास असे लक्षात येते की भारतात एवढा महान लेखक,कवी, शाहीर,तमाशा कलावंत,गायक,समाजसुधारक, तमाशा या शब्दाला लोकनाट्य हे नामपरिवर्तन करणारे व्यक्तिमत्व वंचित कसं काय हाही प्रश्न आमच्या समोर उभा ठाकलाय ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा प्रथम रशियामध्ये जाऊन गाणारे शिवशाहीर म्हणजे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे होय. “डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दिड दिवसाच्या शाळेच्या ज्ञानाच्या जोरावर ३५ कादंबऱ्या,१३कथासंग्रह,
१५ पोवाडे,१३ लोकनाट्य,१ चित्रपट,३नाटके,१ प्रवासवर्णन असे अमाप लेखन साहित्य निर्माण करुन साहित्य क्षेत्रात एक अभिमानाची छाप टाकणारे डॉ.अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यीक होते.यांना डॉ.ही पदवी सोलापूर विद्यापीठांतर्गत देण्यात आलेली आहे. अशा थोर साहित्यिकास भारतरत्न मिळावा अशा आशयाचे पत्र देशाचे पंतप्रधान यांना आदित्य संतोष लोखंडे यांनी ई-मेल द्वारे दिले आहे.

