भीम टायगर सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदना मार्फत मागणी
आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करुन
सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.27जुलै):- मणिपूर येथील महिलावर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर शिक्षा व्हावी आणि मणिपूर राज्यात राष्ट्रपती लावण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भीम टायगर सेना आणि वंचित बहुजन आघाडी च्या उमरखेड यांच्या वतीने देशांच्या राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे दिनांक 26 जुलै 23 रोजी देण्यात आले.
इशान्य भारतातील बहुतांश राज्ये हे आदिवासी बहुल आहेत.
ते लोक आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेऊन आपल्या विकास साधण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहेत.
मणिपूर येथे मैतई जातीच्या लोकांना आदिवासी मध्ये सामावून घेण्याचा घाट तेथील सरकारने घातला आहे.
यामुळे मैतई व आदिवासी जमाती कुकी, नागा यांच्यात संघर्ष टोकाला गेला आहे.त्यातच अनेक आदिवासी समाजातील नागरिकांना बलिदान करावे लागते आहे.याच प्रकरणातून आदिवासी महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली.ही कृती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे.
आपण स्वतः एक आदिवासी महिला आहात आदिवासींच्या वेदनांची जाणिव आपल्याला आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत.म्हणून आपण दोषीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
आपण स्वतः पुढाकार घेऊन मणिपूर येथील महिलावर अत्याचार करून धिंड काढणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी.अशा मागणीचे निवेदन अराजकीय सामाजिक संघटना भीम टायगर सेना आणि वंचित बहुजन आघाडी राजकीय पक्ष उमरखेड यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी भीम टायगर सेनेचे शाम धुळे, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, तालुकाध्यक्ष कैलास कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, तालुकाप्रमुख संतोष जोगदंड, तालुका महासचिव देवानंद पाईकराव,अर्जुन बरडे, चंद्रमणी सावते, विष्णुकांत वाडेकर, सचिन वावळे, सुधाकर कदम, प्रतीक धोंगडे, गंगाराम दवणे, पांडुरंग डुकरे, पुंडलिक शेंबडे, नागेश पाटील, रमेश डुकरे, रंजीत काळबांडे, माधव कवडे इत्यादी दोन्ही सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
