Home Education 16 ऑगस्टच्या आत चिमुर जिल्हा घोषीत करण्यात यावा-केशवराव वरखेडे यांचे नेतृत्वात निवेदन...

16 ऑगस्टच्या आत चिमुर जिल्हा घोषीत करण्यात यावा-केशवराव वरखेडे यांचे नेतृत्वात निवेदन सादर

117

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.26जुलै):-स्वातंत्र्य चळवळीत महत्वपुर्ण भुमिका असणाऱ्या चिमुर शहराला जिल्हा घोषीत करण्यात यावा हि मागणी मागील ४४ वर्षापासुन सुरु आहे. चिमूर जिल्हा घोषीत करण्यात यावा या मागणीकरीता जनभावना तिव्र असल्यामुळे येत्या १६ ऑगस्टच्या आत चिमुर जिल्हा घोषीत करण्यात यावा या मागणीकरीता मुख्यमंत्री यांचे नावे असलेले निवेदन केशवराव वरखेडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले.

चिमुर जिल्हा घोषीत करण्यात यावा या मागणीकरीता स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे गुरुजी यांनी या आंदोलनाचा प्रारंभ केला. त्यांनी त्यांची संपूर्ण हयात या मागणीकरीता घालविली. तत्कालीन लोकप्रतिनिधींना निवेदनाव्दारे तया प्रत्यक्ष चर्चा करून मागणी केली होती. परंतु त्यांचे निधन होईपावेतो जिल्हा घोषीत इाला नसल्यामुळे आता जनतेत शासन व प्रशासनाचे विरोधात तिव्र असंतोष पसरला आहे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता केशवराव वरखेडे यांच्या नेतृत्वात आज (२६ जुलै) उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर केले. त्या निवेदनात असे म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात चिमुर या शहराची शहीद क्रांतीभूमी म्हणून ओळख आहे. चिमुर हे लोकसभा व विधानसभेचे निर्वाचन क्षेत्र आहे. 9 ऑगस्ट 1942 ला ग्वालीवर ट्रॅकवरून महात्मा गांधीनी इंग्रज राजवटीविरुद्ध “चले जाव”चा नारा दिला अवघ्या ६ दिवसात चिमुरात १४ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजाविरुद्ध आंदोलन झाले. त्यावेळी चिमुरचा अवघ्या १६ वर्षाचा तरुण बालाजी रायपुरकर हा नाग पंचमीच्या दिवशी शहीद झाला. १६.१७,१८ ऑगस्ट १९४२ या तिन दिवस चिमुरच्या अभ्यंकर मैदानावर राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी चिमुर हे शहर स्वतंत्र झाले होते, त्याची दखल घेत सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडीओ वरून माहिती दिली होती.

प्रस्तावित चिमूर क्रांती जिल्हयात ब्रम्हपूरी, नागभीड, सिंदेवाही, तळोधी, शेगांव (बु.) भीसी या तालुक्याचा समावेश होवु शकते. चिमुर परिसरात वनसंपदा व खनिज संपत्ती मुबलक आहे. चिगुर शहरापासुन गोंदीया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर व गडचिरोली हे जिल्हे सरासरी १०० किलोमीटर अंतराच्या वर आहेत. त्यामुळे चिमुर शहर हे मध्यभागी आहे. चिमुरच्या लगतच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असुन मुक्ताई, झरी (नवतळा), रामदेगी, सातबहिणीचे डोंगर आदी देवस्थान आहेत. चिमुरचा विकास करण्याच्या उद्देशाने चिमुर क्रांती जिल्हा होणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर या क्षेत्राचा विकास साधण्याकरीता विशेष बाब ५ हजार कोटी रूपये देवून या क्षेत्राचा कायापालट करावा अशीही मागणी करण्यात आली.

निवेदन सादर करणान्या शिष्टमंडळात जेष्ठ नेते केशवराव वरखेडे, डॉ. संजय पिठाडे, समाजसेवक ग्रंथमित्र सुभाष शेषकर, सुरेश डांगे, सामाजिक कार्यकर्ता केमदेव वाडगुरे, सुधीर पोहनकर, प्रा. महादेवराव पिसे, योगेश अगडे, अब्दुल रफीक बाबुगियों शेख, रमेश मडावी, गजानन कारमोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here