Home धरनगाव महाराष्ट्र सुरक्षा फोर्स मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल अभिजीत पवार चा धरणगांव येथे गौरव

महाराष्ट्र सुरक्षा फोर्स मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल अभिजीत पवार चा धरणगांव येथे गौरव

55

 

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगाव – स्वामी समर्थ नगर धरणगाव येथील रहिवासी अभिजीत कैलास पवार ची महाराष्ट्र सुरक्षा फोर्स येथे नियुक्ति झाल्याने कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी, जोशाबा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुधाकर मोरे सर, अनोरा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी सर, विलास महाजन सर ,अनिल पाटील सर,संजय पवार, आर.डी.महाजनसरश्री संजय पाटील, श्री कैलास पवार सर, नारायण वाणी ,अरुन पाटील, परमेश्वर रोकडे सर आणि अभिजीत ने बारावी सायन्स नंतर बी ई आय टी उत्तीर्ण करून पुण्याला नोकरीसाठी जात असताना त्याची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याचे पत्र मिळाल्यामुळे तो पुण्याहून परस्पर प्रशिक्षणासाठी दाखल झाला. तेथे मोबाईल नादुरुस्त झाल्यामुळे ट्रेनिंग सुरू झाल्यावर घरी फोन केला की माझी निवड महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये झालेली असून मी आता प्रशिक्षणासाठी हिंगोली राज्य राखीव पोलीस बल 12 येथे दाखल झालेलो आहे आणि प्रशिक्षण सुरू आहे . त्याबद्दल त्याचे आई-वडिलांना,गुरूजन, पालकांना व परिसरातील नागरिकांना खूप अचंबित केले. त्यामुळे आनंदोत्सव साजरा झाला.
देशसेवेसाठी निवड झाल्यामुळे त्याचे कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी यांनी भारत मातेची प्रतिमा देऊन आणि जोशाबा मंडळाचे कार्याध्यक्ष सुधाकर मोरे यांनी सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका देऊन व कॉलनी वाशीयांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले.तो जि.प.पुरस्कार प्राप्त श्री कैलास पवारसर यांचा मुलगा आहे.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन विलास महाजन यांनी केले व आभार मोरेसर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here