Home Education कायद्याच्या चौकटीतून….सासरच्या मालमत्तेस सुनेचा अधिकार किती?

कायद्याच्या चौकटीतून….सासरच्या मालमत्तेस सुनेचा अधिकार किती?

109

संपत्ती मालमत्तेविषयी माहिती नसल्याने अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. विशेषतः सुनेचा मालमत्तेत अधिकाराविषयी मुलींना जे अधिकार असतात, तेच एक सुन म्हणून त्या तो हक्क मिळतो का? असे अनेक वेळा वकीलांना प्रश्न विचारल्या जातो. सासरच्या कोणत्या संपत्तीवर सुन म्हणुन एक स्त्री दावा करू शकते? याचे नेमके नियम काय आहेत. हे माहिती असणे आवश्यक असते. नियम-कायदे हे सुद्धा वेळोवेळी सुधारीत होत असतात. संहिताही गरजेनुसार बदलल्या जातात आणि कायदे सुध्दा. मालमत्ता संबंधीत कायद्यांबाबत लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. त्यासंबंधीची माहिती नसल्यामुळे संपत्ती संबंधीत वादही होतात. हे निरर्थक वाद अनेकदा न्यायालयात पोहचतात. सुनेचे कोणते अधिकार आहेत, विशेषतः सासरच्या घरात आणि संपत्तीवर तिचा किती अधिकार आहे. कायदा काय म्हणतो ?

एका मुलीला मुलगी म्हणुन तिला वडीलोपार्जीत संपत्तीतही वाटा मिळतो. पण सासरच्यांच्या वडीलोपार्जीत संपत्तीत सुनेचा वाटा किती असतो? याविषयी संभ्रम असतो, कायद्याचे ज्ञान नसल्याने खरंतर हा गोंधळ उडतो,

सुरक्षा कायद्याने महिलांना पतीसोबत घरात राहण्याचा अधिकार दिला. हा अधिकार स्त्रीच्या पोटगी, मानसिक आणि शारिरीक हिंसाचारापासून संरक्षणाच्या अधिकाराव्यतीरिक्त आहे. मात्र पतीच्या संपत्तीत पत्नीच्या अधिकारासंबंधी मुद्दाही संपत्तीच्या विभागणीशी संबंधीत महत्वाचा मुद्दा आहे. पती आणि सासरच्या संपत्तीमध्ये पत्नीचा काही हक्क आहे की नाही आणि यासंबंधी नियम काय आहे? ज्या पुरुषाशी महिलेचा विवाह झाला आहे. त्याच्याकडे स्वतःची कोणतीही मालमत्ता असेल तर याबाबतचे नियम व कायदे स्पष्ट आहेत, व्यक्ती स्वतःची मालमत्ता जसे जमीन, घर, दागीणे किंवा काहीही असो, त्यावर फक्त त्या व्यक्तीचा अधिकार असतो. म्हणजेच ज्याने संपत्ती कमावली आहे. तो ती संपत्ती विकु शकतो, गाहाण ठेवु शकतो किंवा दोन्ही करू शकतो. यासंबंधी सर्व अधिकार त्याच्याजवळ सुरक्षित असतात.

सासु-सासऱ्यांच्या संपत्तीवर सामान्य परिस्थितीत महिलांचा सुन म्हणून कोणताही अधिकार नसतो. मग ते जिवंत असो किंवा नसोत. सुन त्यांच्या संपत्तीवर कोणताही दावा करु शकत नाही. सासु-सासऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या संपत्ती अधिकार सुनेला नाही तर तिच्या पतीला मिळतो. परंतु सासु-सासऱ्यांच्या आधीच पतीचा मृत्यु झाला तर अशा परिस्थितीत सुनेला संपत्तीमध्ये अधिकार मिळतो. मात्र यामध्ये सासु-सासऱ्यांनी त्यांची संपत्ती इतर कोणाच्या नावावर केलेली नसावी.

(वरिल माहिती संकलीत स्वरुपाची असून प्रत्यक्ष न्यायालयात दाद मागतांना कायदे तज्ञांचा सल्ला घ्यावा)

✒️संकलन:-सुयोग सुरेश डांगे(चिमुर,जि.चंद्रपूर)मो:-८६०५५९२८३०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here